Santosh Deshmukh Case : "...तर इतिहास माफ करणार नाही, देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने आंदोलन केल्यानंतर रोहित पवार, सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या कुटुंबाला आंदोलन करावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.

Mumbai Tak

मुंबई तक

14 Jan 2025 (अपडेटेड: 14 Jan 2025, 01:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"

point

सुषमा अंधारे, रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिनाभरापेक्षा जास्त काळ उलटला आहे. काही आरोपी ताब्यात घेतले असून, आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची काय चौकशी झाली? प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्यानं देशमुख कुटुंब अस्वस्थ झालं आहे. यामुळेच काल मस्साजोग गावात आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वत: धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले आणि गावात एकच गोंधळ झाला. धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्यासाठी जरांगेंनी अनेकदा विनंत्या केल्या. त्यानंतर ते खाली आहे. या सर्व धावपळीनंतर देशमुखांच्या बहिणीचीही प्रकृती बिघडली. एकूणच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा सध्या संघर्ष सुरू आहे. यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणी CM फडणवीसांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीका केली असून, या कुटुंबाला आंदोलन करावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवार काय म्हणाले? 

"मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं. 

राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या."

 

हे ही वाचा >> संतोष देशमुखांच्या पत्नीचा पोलीस जबाब जसाच्या तसा, वाल्मिक कराडवर गंभीर आरोप...

काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 

"उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त "आकां"चे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोग मध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप  इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा... !!"




    follow whatsapp