रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेन धगधगतं आहे. अत्यंत बिकट अवस्थेत युक्रेन आहे. अशात व्लादिमिर झेलेन्स्की यांनी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी हा दावा केला आहे. याचाच एक भाग म्हणून युक्रेनचं शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूस रवाना झालं आहे.
ADVERTISEMENT
आम्ही रशियासोबत चर्चा करायला तयार आहोत पण बेलारूसच्या सीमेवर चर्चा करण्याची तयारी आहे. युक्रेन बेलारूसच्या सीमेवर प्रिप्याट नदीजवळ असलेल्या रशियाच्या शिष्टमंडळाला आम्ही भेटायला तयार आहोत. असं झेलेन्स्कींनी म्हटलं आहे. युक्रेन शिष्टमंडळाच्या प्रवासादरम्यान, चर्चेदरम्यान आणि तिथून परत येईपर्यंत सगळी विमानं, हेलिकॉप्टर्स आणि क्षेपणास्त्र बेलारूसच्या धरतीवर असतील याची जबाबदारी अलेक्झांडर लुकाशेंकोंनी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. बेलारूसमध्ये आम्ही त्यांना भेटणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.
युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमधला तणाव हा दिवसागणिक वाढतो आहे. युक्रेन सर्व शक्तीनिशी रशियाला उत्तर देतो आहे. तर रशियाच्या विरोधात युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या विरोधात खटला दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाला अडचणीत आणण्यासाठी युक्रेन पूर्ण प्रयत्न करताना दिसतो आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरूद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती दिली आहे. युक्रेनने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये रशियाविरोधात हा अर्ज केला आहे. युक्रेनवरच्या आक्रमाणसाठी रशियाला जबाबदार ठरवलं पाहिजे अशी मागणी यामध्ये झेलेन्स्कींनी यामध्ये केलं आहे. युक्रेनमधल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये युद्ध सुरू आहे. संघर्ष चांगलाच ताणला गेला आहे. अशात आता युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, जर युद्ध सुरु नसतं, तर बेलारुसची राजधानी मिन्स्कमध्ये चर्चा शक्य होती, आता नाही. युक्रेनविरोधी भूमिका नसलेल्या इतर कोणत्याही देशात चर्चा करण्यास तयार असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. बेलारुमधील चर्चेस नकार देताना झेलेन्स्की यांनी रशियाचे सैनिक बेलारूसच्या भूमितून युक्रेनवर हल्ले करत आहेत. अशा वेळी मिन्स्कमध्ये शांती वार्ता होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.
रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जात असून, वार रुममध्ये बेलारुसने रशियाची मदत केली आहे. रशियाकडून युक्रेनवर केल्या जात असलेल्या आक्रमणात बेलारुसही सहभागी आहेत. त्यातच युक्रेनवर हल्ला करण्यासाठी बेलारुसने आपल्या भूमिवर आण्विक शस्त्र तैनात करण्याचीही परवानगी रशियाला दिलेली आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये बेलारुस सहभागी असल्याचा दावा करत ब्रिटननं बेलारुसच्या फुटबॉल टीमचा व्हिसा रद्द केलेला आहे.
ADVERTISEMENT