रशिया-युक्रेन युद्ध : नको होतं तेच घडलं! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबई तक

• 11:06 AM • 01 Mar 2022

गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युद्ध संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. (Indian Student died in ukraine) अरिंदम बागची यांनी ट्विट करून युक्रेनच्या खार्किव्ह शहरात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. […]

Mumbaitak
follow google news

गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युद्ध संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. (Indian Student died in ukraine)

हे वाचलं का?

अरिंदम बागची यांनी ट्विट करून युक्रेनच्या खार्किव्ह शहरात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. “हे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे की, खार्किव्हमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे आणि कुटु्बियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, अस बागची यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘ब्रेडचा एकच तुकडा राहिलाय, कुणीतरी आम्हाला
बाहेर काढा’; भारतीय विद्यार्थ्यांची आर्त हाक

अरिंदम बागची यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की भारताचे परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या उच्चायुक्तांशी चर्चा करत आहेत आणि खार्किव्ह अन्य संघर्ष सुरु असलेल्या भागातील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यावं, यावर पुन्हा पुन्हा जोर देत आहेत. त्याचबरोबर युक्रेन आणि रशियातील भारताचे राजदूतही ही वारंवार ही मागणी करत आहेत”, अशी माहिती बागची यांनी दिली आहे.

भारतीय विद्यार्थी अडकले; शिवसेना खासदार चतुर्वेदी पोलंडच्या राजदूतांवर भडकल्या

मयत विद्यार्थी कर्नाटकातील

विशेष लष्करी मोहिमेच्या नावाखाली रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्यात आलं. त्यानंतर कीव्ह, खार्किव्ह, सुमी यासह इतर शहरांमध्ये धुमश्चक्री सुरू असून, याच संघर्षात कर्नाटकातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नवीन शेखरप्पा असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो कर्नाटकातील चलगिरी येथील आहे.

तत्काळ कीव्ह सोडा -भारतीय उच्चायुक्तालय

युद्धस्थिती उद्भवलेल्या युक्रेनच्या विविध शहारांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सरकारने हाती घेतलं असून, युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांत दाखल झालेल्या भारतीयांना मायदेशात आणलं जात आहे.

केंद्रीय मंत्रीही युक्रेन शेजारच्या देशात गेले आहेत. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतलेली असतानाच आज अचानक भारतीय दूतावासाने ट्विट करत तत्काळ कीव्ह सोडा आणि मिळेल त्या वाहनाने शहरातून बाहेर पडा, असं आवाहन दुपारी बारा वाजता करण्यात आलं होतं. “कीव्हमधील भारतीयांना आवाहन. विद्यार्थ्यांसह सर्व भारतीयांना तत्काळ कीव्ह सोडावं. उपलब्ध असलेल्या रेल्वेनं अथवा इतर कोणत्याही वाहनाने”, असं भारताच्या युक्रेनमधील दूतावासानं म्हटलं होतं.

    follow whatsapp