धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव वापरण्यात निर्बंध आणले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं. पण, या चिन्हावरून समता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. हे समता पार्टी चिन्ह असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे ठाकरेंचं चिन्ह जाऊ शकतं का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरेंच्या गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलंय. तर शिंदे गटाला ढाल आणि दोन तलवारीचं चिन्ह देण्यात आलंय. पण, ठाकरेंच्या समोरील अडचणी थांबण्याची चिन्ह दिसेनात. निवडणूक आयोगाने चिन्ह दिल्यानंतर समता पार्टीने या चिन्हावर दावा केलाय.
‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर आता दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केलाय. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. यावर आज बुधवारी (१२ ऑक्टोबर) निर्णय अपेक्षित आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीकडून करण्यात आलीये.
‘शिवसेना एकनाथ शिंदेंना देण्याची व्यवस्था’; निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधी जयंत पाटलांचं विधान
समता पार्टीने मशाल चिन्हासाठी निवडणूक आयोगात का धाव घेतलीये?
समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, “जॉर्ज फर्नांडीस यांनी १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केली. १९९६ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना धगधगती मशाल हे चिन्ह दिले होते. आता निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात २००४ मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंना त्यांचे धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून या चिन्हावर हक्क सांगितला आहे”, असं देवळेकर यांनी सांगितलं.
देवळेकर म्हणणं आहे की, “अंधेरीत तगडा उमेदवार निवडला आहे. एकाच चिन्हावर दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यास मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच धगधगती मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये अशी मागणी केली आहे.”
शिंदेंचे पर्याय निवडणूक आयोगाने का नाकारले? पक्ष, चिन्ह देण्याचे नियम काय?
उद्धव ठाकरेंचं चिन्ह जाण्याची शक्यता किती?
जॉर्ज फर्नांडीस यांनी स्थापन केलेल्या समता पार्टीला देण्यात आलेली प्रादेशिक पक्षाची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतली होती. २००४ मध्ये राज्य पक्षाची मान्यता काढून घेतल्यानंतर समता पार्टीला देण्यात आलेलं धगधगती मशाल हे चिन्ह फ्री करण्यात आलं होतं. हे चिन्ह फ्री असल्यानेच निवडणूक आयोगाने हे चिन्ह ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे चिन्ह मंजूर केलंय. त्यामुळे ठाकरेंना देण्यात आलेलं चिन्ह पुन्हा काढून घेतलं जाऊ शकत नाही.
ADVERTISEMENT