Sanatan Dharma: गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्मावर प्रचंड टीका केली जात आहे. पहिल्यांदा उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आजाराबरोबर केली. तर त्यानंतर ए राजा आणि दक्षिणेतील बडा अभिनेता प्रकाश राज यांनीही सनातनवर सडकून टीका केली. या दोन्ही घटनेनंतर मात्र केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतही भडकले आहेत. त्यावरुन ते म्हणाले की, सनातनवर टीका करणाऱ्यांची आणि सनातनला विरोध करणाऱ्यांनी जीभ हासडून काढून. आणि जर सनातनकडे वाकडी नजर जरी बघितली तरी त्यांचे डोळे काढू असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ उठाला आहे.
ADVERTISEMENT
टीका करणाऱ्यांचीही खैर नाही
गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सनातन धर्माविरोधात कोणीही आपली ताकद टिकवू शकणार नाही. सनातन धर्मावर बोलताना त्यांनी सांगितले की, भारताला आणि त्या संस्कृतीला लुटण्यासाठी कित्येक लोकं आली आहे. अगदी चारशे वर्षापूर्वीपासून सनातन धर्माला संपवण्यासाठी आक्रमणं करण्यात आली. मात्र आमच्या पूर्वजांनी भारताची सभ्यता आणि संस्कृती वाचवली. त्यामुळे आम्ही आता शपथ घेतोय की, सनातन धर्मावर बोलणाऱ्यांची आणि टीका करणाऱ्यांची आम्ही खैर करणार नाही.
औवेसींनी साधला निशाणा
हे ही वाचा >>Maratha Reservation : संजय राऊत संतापले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या या वक्तव्यावर बोलताना एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, नरेंद्र मोदी या आपल्या कॅबिनेट मंत्र्याच्या हिंसेचे समर्थन करतात का, कारण ते खुलेआम धमकी देत आहेत.
सनातन धर्माचे सामर्थ्य दाखवावे
गजेंद्र सिंह शेखावत यांनी सनातन धर्मावर वक्तव्यही अशा वेळी केले आहे की, तामीळनाडूतील डीएमकेचे मंत्री थिरु पोनमुडी यांनी म्हटले आहे की, इंडियाची म्हणजे सनातन धर्माविरोधात उभा राहिलेली आघाडी आहे. त्यांनी हेही सांगितले की, इंडिया आघाडीचा अजेंडा पण हाच आहे की, हिंदू धर्म नष्ट करणे हा आहे. त्यामुळे पोनमुडी यांच्या त्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री शोभा करंजलाजे म्हणाल्या की, आता इंडिया आघाडीने तर हिंदुविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्यामुळे हिंदुनी आता जागे होऊन त्यांनी सनातन धर्माचे सामर्थ्य दाखवावे असंही त्यांनी आवाहन केले आहे.
ही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?
सद्बुद्धी देवो
सनातन धर्मावर जाहिरपणे वक्तव्य केली जात असतानाच कथाकार प्रदीप मिश्रा यांचेही एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. जे कोणी सनातन धर्माला डेंग्यू म्हणत असतील त्यांनी आधी आपल्या पूर्वजांची नावं सांगावी, कारण पूर्वीही तेही सनातन होते.त्यामुळे असं वक्तव्य करणाऱ्यांना भगवान भोलेनाथ त्यांना सद्बुद्धी देवो असा टोमणाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे धर्मावरुन कुणालाही दुखवू नका असंही त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT