Pune Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. कधी कोयते घेऊन फिरणारे टोळके, कधी भाईगिरी करणारे दादा, तर कधी गाड्यांची तोडफोड. या घटनांमुळे पुणे नेहमी चर्चेत आहे. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या एका घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. या व्हिडीओमध्ये एका महिलेचे स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण झालं होतं. मात्र, या प्रकरणात आता एक वेगळाच ट्वीस्ट आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ढसाढसा रडल्या, कागद-सह्या दाखवल्या, करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या कोणत्या 3 निकटवर्तीयांची नावं घेतली?
घरगुती वादातून ही घटना घडल्याचं पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पती-पत्नीमधील वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील काळभोर नगर परिसरातून स्कॉर्पिओमधून तिघांनी महिलेचे अपहरण केल्याचा संशय आहे. या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, तत्काळ तपास करून अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा उलगडा केला आहे. ही संपूर्ण घटना अपहरणाची नसून, पती-पत्नीमधील वादातून घडल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा >> AI चं काम लय बेक्कार! सायबर गुन्हेगारांची लॉटरी लागणार? थेट PM मोदींचंच बोगस मतदान कार्ड बनवलं
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या पती-पत्नीमध्ये काळभोर नगर परिसरात येताच भांडण झालं होतं. त्यानंतर रागात असलेली बायको स्कॉर्पिओतून खाली उतरली आणि रागाने पुढे निघून गेली. स्कॉर्पिओमध्ये बसलेले सर्वजण त्या महिलेला समजवत होते, विनवण्या करत होते. पण ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. रात्रीची वेळ असल्यानं महिलेला जबरदस्तीने उचलून स्कॉर्पिओमध्ये बसवलं. गाडीत महिलेचा मुलगाही होता.
हे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि त्या महिलेचं अपहरण झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या काही तासांतच घटनेचा उलगडा केला. महिलेचं हे दुसरं लग्न असून, तिला एक मुलगाही आहे. तसंच ही गोष्ट फक्त कौटुंबिक वादातून घडलेला प्रकार होता. त्यामुळे हे अपहरणाचं प्रकरण नसल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
