पुण्याकडे येेणाऱ्या कारचा अपघातात चक्काचूर! पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

• 07:08 AM • 25 Dec 2021

–स्वाती चिखलीकर,सांगली दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. मृतामध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. सांगली जिल्ह्यात असलेल्या कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातांमध्ये […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर,सांगली

हे वाचलं का?

दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. मृतामध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

सांगली जिल्ह्यात असलेल्या कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातांमध्ये विट्यातील कंत्राटदार गजानन निकम यांच्या मुलगा सुदर्शन निकम आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल झांबरे आणि धनश्री झांबरे या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी बसचा अपघात, तीन कामगारांचा मृत्यू

विटा येथील सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे खेराडे येथून विट्याकडे येत होते. तर तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल माणिक झांबरे आणि त्यांच्या पत्नी आपल्या नातेवाईकांसह तासगावहून पुण्याकडे निघाले होते.

दोन्ही कार आपापल्या दिशेनं भरधाव जात होत्या. कडेगाव तालुक्यातील नेवरी गावाजवळ दोन्ही गाड्यांचा समोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही कारचा या भीषण अपघातात अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

दरम्यान, या अपघातात प्रज्वल पुंडलिक झांबरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. तर मयत सुदर्शन निकमसोबत असलेला संग्राम संजय गायकवाड हा तरुण देखील जखमी झाला आहे.

    follow whatsapp