बावनकुळेंनी ‘ते’ विधान केलं अन् शिंदेंचं प्रकरण बाहेर आलं : संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

22 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:31 AM)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढण्यात आणि त्यांना अडचणीत आणण्यामागे भाजपचा हात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच आता शिंदेंवरील लक्ष हटविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. राहुल शेवाळेंना […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढण्यात आणि त्यांना अडचणीत आणण्यामागे भाजपचा हात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच आता शिंदेंवरील लक्ष हटविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

हे वाचलं का?

राहुल शेवाळेंना हा अधिकार आहे का? संजय राऊत

खोके सरकारचे एक खासदार राहुल शेवाळे यांनी काहीही कारण नसताना एक वेगळा विषय उपस्थित केला. एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना अचानक ते आदित्य ठाकरे यांच्यावर घसरले. त्यानंतर तो विषय महाराष्ट्र विधानसभेपर्यंत रंगविण्यात आला. चौकशीची मागणी केली गेली. प्रश्न इतकाच आहे की राहुल शेवाळे यांना याबाबत बोलण्याचा अधिकार आहे का?

एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यामागे भाजपचा हात : संजय राऊत

ज्या भूखंडावरुन तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत तो मुद्दा खरंतर याआधी भाजपाच्याच आमदारांनी तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दटके यांनी याबद्दलचे प्रश्न विचारले होते. आता भाजपाच्याच आमदारांनी उपस्थित केलेला तारांकित प्रश्न आम्ही लावून धरला आहे.

इतकंच नव्हे, नागपूरमध्ये एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांच्या समोर बावनकुळे म्हणाले होते, मी प्रदेशाध्यक्ष आहे तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि त्यानंतरच हे प्रकरण बाहेर आलं. खोके सरकारनं भाजपाचं राजकारण समजून घ्यावं. भाजपचे राज्यातील नेते तोंडदेखली बाजू घेत असतील पण दिल्लीत आणि पडद्यामागे काय सुरु आहे, हे आम्हाला माहित आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंवरील लक्ष हटविण्यासाठीच हे आरोप : संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे, त्यावरुन लक्ष हटविण्यासाठीच हा विषय विधानसभेत काढण्यात आला. १०० कोटींपर्यंतचे गैरव्यवहार आहेत. रेवड्या वाटाव्या तशा हे भूखंड वाटले. हा भ्रष्टाचार आहे. हे प्रकरण शेकत हे लक्षात येताच लक्ष विचलित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही :

नागपूर न्यास भूखंड घोटाळा इतका गंभीर आहे की यात १०० कोटींपर्यंतचा गैरव्यवहार आहे. त्यावर आम्ही नव्हे तर न्यायालयानंच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे शिंदे सरकार पडणार हे निश्चित आहे. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, त्याआधीच हे सरकार कोसळेल, हे लिहून घ्या, असंही संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp