Sanjay Raut On PM Narendra Modi, मुंबई : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणांचा पाऊस पाडला. परंतु, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. "देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या देशाची जनता जागृत आहे. प्रसंगी बलिदानासाठीही सज्ज आहे. वाईट इतकच वाटतं की, देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पुन्हा एकदा स्वतंत्र हिंदुस्थानात, जुम्मू काश्मीरमध्ये जवानांचं बलिदान झालं. अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात कॅप्टनसह काही जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी आणि त्याचं सरकार आमच्या जवानांचं बलिदान रोखू शकलं नाही. पण त्यांच्या भाषणात मोठ्या मोठ्या गर्जना असतात", असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
जनतेची सातत्याने गळचेपी होत आहे. ब्रॉडकास्ट बील मागे घ्यावं लागलं. हे बील स्वातंत्र्याची गळचेपी करणारं होत. ते एकप्रकारे सेन्सॉरशिप होतं. विरोधी पक्ष मजबुतीनं उभा राहिला म्हणून ब्रॉडकास्ट बील रद्द करावा लागला. वक्फ बोर्डाचं बीलही त्यांना तात्पुरतं मागं घ्यावं लागलं. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या देशाची जनता जागृत आहे. प्रसंगी बलिदानासाठीही सज्ज आहे. वाईट इतकच वाटतं की, देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पुन्हा एकदा स्वतंत्र हिंदुस्थानात, जुम्मू काश्मीरमध्ये जवानांचं बलिदान झालं. अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात कॅप्टनसह काही जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी आणि त्याचं सरकार आमच्या जवानांचं बलिदान रोखू शकलं नाही. पण त्यांच्या भाषणात मोठ्या मोठ्या गर्जना असतात.
हे ही वाचा >>Narendra Modi : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे धाबे दणाणणार; PM मोदींनी घेतला आक्रमक पवित्रा, म्हणाले, "आरोपींना कठोर शिक्षा..."
"३७० कलम हटवलं आणि त्याचं..."
समान नागरी कायदा आणि वन नेशन, वन ईलेक्शन या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वातंत्र्यदिनी म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचा मोदींच्या या भूमिकेला पाठिंबा असेल का? यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, मोदींकडे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारं नाही. ३७० कलम हटवलं आणि त्याचं राजकारण करून मतं मागितली. ३७० कलम काढल्यावर आम्ही आनंदाने त्याला पाठिंबा दिला. त्यांना विरोध केला नाही. पण ३७० कलम हटवल्यावर जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली? हे प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवं होतं.
हे ही वाचा >>PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्धार, लाल किल्ल्यावर घोषणांचा पाऊस, म्हणाले; "२०३६ चं ऑलिम्पिक..."
प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते. ते आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे आहेत. हे त्यांनी विसरू नये. काश्मीरमध्ये काय बदल झाला? लोकशाहीच्या मार्गाने विधानसभेच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. विधानसभेला टाळं आहे. अजूनही इंटरनेट बंद आहे. रोजगार नाही. अमरनाथ यात्रा सुरक्षीत नाही. वैष्णव देवीची यात्रा सुरक्षीत नाही. त्या ठिकाणी असलेला सामान्य नागरिक आजही भयभीत आहे. ३७० कलम रद्द करून तुम्हाला फायदा झाला पण देशाला फायदा झाला नाही. शिवसेनेनं हिंदूत्त्वाच्या आणि राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्दयावर राम मंदिरला पाठिंबा दिला, असंही संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT