सुटका होणार असल्याचं ऐकून आर्यनला झाला आनंद! शाहरूख खान ‘मन्नत’वरून निघाला

सौरभ वक्तानिया

• 04:03 AM • 30 Oct 2021

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल 27 दिवसांनंतर घरी परतणार आहे. दोन वेळा कनिष्ठ न्यायालयात जामीन नाकारण्यात आल्यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला. त्यानंतरही आर्यनला दोन दिवस ऑर्थर रोड तुरुंगात मुक्काम करावा लागला. आज अखेर आर्यन खानची ‘मन्नत’वर घरवापसी होणार आहे. जामीन आदेश प्राप्त झाल्याचं तुरुंग […]

Mumbaitak
follow google news

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल 27 दिवसांनंतर घरी परतणार आहे. दोन वेळा कनिष्ठ न्यायालयात जामीन नाकारण्यात आल्यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला. त्यानंतरही आर्यनला दोन दिवस ऑर्थर रोड तुरुंगात मुक्काम करावा लागला. आज अखेर आर्यन खानची ‘मन्नत’वर घरवापसी होणार आहे. जामीन आदेश प्राप्त झाल्याचं तुरुंग प्रशासनाने कळवल्यानंतर आर्यनने आनंदून गेला. दरम्यान, आर्यनला घेण्यासाठी शाहरूख खान निघाला आहे.

हे वाचलं का?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहे. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आर्यनला शुक्रवारी तुरुंगातून सोडण्यात येईल असं म्हटलं जात होतं. मात्र, जामीनानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात पूर्ण दिवस गेला.

‘त्यांना बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं’, अनुराग कश्यपने सांगितला वानखेडेंबद्दलचा ‘तो’ वाईट प्रसंग

शुक्रवारी उशिरापर्यंत बेल ऑर्डर तुरुंगात पोहचू शकली नाही. त्यामुळे आर्यनचा मुक्काक वाढला. अखेर आज आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहे. आज (30 ऑक्टोबर) पहाटे 5.30 वाजता ऑर्थर रोड तुरुंगातील बेल बॉक्स उघडण्यात आला. बेल बॉक्समध्ये आर्यनच्या जामीनाचे आदेशही होता. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने याबाबतची माहिती आर्यन खानला दिली. ही माहिती ऐकल्यानंतर आर्यनला आनंद झाला. त्याने तुरुंगातून सुटणार असल्याची माहिती जेलमधील इतर कैद्यांनाही दिली.

ऑर्थर रोड तुरूंगातील अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला आर्यनच्या सुटकेबद्दलची माहिती दिली. आर्यनच्या जामीनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. जामीनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याबद्दल आर्यन खानलाही कळवण्यात आलं आहे. तुरुंगातून सुटणार असल्याचं ऐकून तो खूप आनंदी झाला आणि त्याने इतरांनाही हे सांगितलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Aryan Khan Bail : जामीन मंजूर करताना कोर्टाने ठेवल्या आहेत ‘या’ 14 अटी

आर्यन खानबरोबर अनेकांचे जामीन आदेश मिळाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या जामीनाची प्रक्रिया एकत्रच केली जात आहे. आर्यनला सर्वांसोबतच तुरुंगातून बाहेर सोडलं जाईल. आर्यनला 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यान सोडलं जाईल अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, आर्यन खानची जामीनावर सुटका होणार असून, त्याला घेण्यासाठी शाहरुख खान मन्नतवरून निघाला आहे. आर्यन खानला घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलच्या दिशेने तीन गाड्या रवाना झाल्या आहेत.

‘मन्नत’वर आर्यनच्या स्वागताची तयारी

आर्यन खान 2 ऑक्टोबरपासून घरापासून दूर आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन घरी परतणार असून, मन्नतवर उत्साहाचे वातावरण आहे. आर्यनच्या स्वागतासाठी कालपासूनच तयारी सुरू झाली होती. शुक्रवारी संपूर्ण घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

जुही चावला झाली जामीनदार

अभिनेत्री जुही चावलाने शुक्रवारी आर्यन खानचा जामीन भरला आहे. जामीन भरण्यासाठी कुटुंबीयांपैकी कुणी चालत नाही. फॅमिली फ्रेंड्सने जामीन भरायचा असतो, त्यामुळे जुही चावलाने हा जामीन भरला. जुही चावलाने सत्र न्यायालयात जाऊन जामीनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. जुही चावला आणि शाहरुख खान हे दोघेही रेड चिलीज एंटरटेन्मेंट या कंपनीत पार्टनर आहेत.

    follow whatsapp