राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज कोरोनाला प्रतिबंध करणारी लस घेतली आहे. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी कोरोनाला प्रतिबंध करणारी लस घेतली आहे. कोव्हिशिल्ड ही सीरम इन्स्ट्यिट्युटने निर्मिती केलेली लस आज शरद पवार यांना देण्यात आली. शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?
“आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो. ” असं शरद पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेणारे महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत.आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांनाही कोरोना लस देण्यात येते आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड या लसी आपल्या देशात देण्यात येत आहेत. लस कुणाकुणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावली ठरवली आहे.
ADVERTISEMENT