टीम इंडियाचा ‘गब्बर’ फॉर्मात, वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार?

मुंबई तक

06 Apr 2023 (अपडेटेड: 06 Apr 2023, 08:52 AM)

Shikhar Dhawan chance in the world cup 2023 :आयपीएल 2023 च्या हंगामात पंजाबचा किंग्सचा स्टार खेळाडू शिखर धवन फॉर्मात परतला आहे. जर शिखर धवन असाच फॉर्मात राहिला तर तो वर्ल्ड कप संघात स्थान मिळवणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Shikhar Dhawan chance in the world cup 2023

Shikhar Dhawan chance in the world cup 2023

follow google news

Shikhar Dhawan chance in the world cup 2023 : आयपीएल 2023 च्या हंगामात टीम इंडियाचा सलामीवीर आणि पंजाबचा किंग्सचा स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) फॉर्मात परतला आहे. एका पेक्षा एक दर्जेदार खेळ तो आयपीएलमध्ये दाखवत आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने 40 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 86 धावा ठोकल्या होत्या.या त्याच्या धडाकेबाज खेळीने त्याने पुन्हा एकदा दमखम दाखवला आहे. दरम्यान जर शिखर धवन (Shikhar Dhawan)असाच फॉर्मात राहिला तर तो वर्ल्ड कप संघात स्थान मिळवणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (shikhar dhawan good form in ipl he get a chance in the world cup 2023)

हे वाचलं का?

आयपीएलमध्ये बुधवारी पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्समध्ये (Rajsthan Royals) 8 वा सामना रंगला होता. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. राजस्थान रॉयल्स 197 धावांचे आव्हान पुर्ण करू शकली नाही आणि पंजाबने 5 धावांनी हा सामना जिंकला होता. या सामन्यात शिखर धवनने (Shikhar Dhawan) 56 बॉलमध्ये 86 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर कोलकत्ता विरूद्धच्या सामन्यात त्याने 29 बॉलमध्ये 40 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या दोन सामन्यातच त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. आता आगामी सामन्यात तो कशी खेळी करतो, हे पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा : वडील कारगिल युद्धात लढले, मुलाने IPLमध्ये दाखवला दम; कोण आहे ध्रुव जुरेल?

गेल्या काही सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी टीम इंडियाच्या संघात नवख्या खेळाडूला संधी दिली जात आहे. हे नवखे खेळाडू स्वत:ला चांगल्या प्रकारे सिद्ध देखील करत आहेत. त्यामुळे शिखर धवन संघातून बाहेर होता. 2023 मध्ये तर त्याने संघातून एकही सामना खेळला नाही आहे. मात्र आयपीएलमधला त्याचा परफॉर्मन्स पाहता टीम इंडियात तो पुन्हा पुनरागमन करू शकतो.

आयसीसी टुनामेंटमध्ये चांगला रेकॉर्ड

शिखर धवनने (Shikhar Dhawan) आयसीसी टुनामेंटमध्ये नेहमी चांगलाच खेळ दाखवला आहे. 2013 मध्ये खेळवल्या गेलेल्या चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये धवनने 90 च्या सरासरीने 363 धावा केल्या होत्या. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 50 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहेत. तसचे 2017 च्या चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये 67 च्या सरासरीने त्याने 338 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचा हे आकडे खुपच चांगले आहेत.

आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड

टी20त : 68 सामने, 1 हजार 759 धावा, 27.92 सरासरी, 11 अर्धशतक
वनडे इंटरनेशनल : 167 सामने, 6 हजार 793 धावा, 44.11 सरासरी, 39 अर्धशतक
टेस्ट क्रिकेट : 34 सामने, 2 हजार 315, 40.61 सरासरी, 7 शतक आणि 5 अर्धशतक
आयपीएल : 208 सामने, 6 हजार 370 धावा, 35.58 सरासरी, 2 शतक आणि 48 अर्धशतक

दरम्यान शिखर धवनचे (Shikhar Dhawan) हे आकडे पाहता आणि सध्याचा आयपीएलमधला फॉर्मपाहता त्याला वनडे वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp