ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाने खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिलीये. त्यामुळे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे…
महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी भूकंप झाला. शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं.
केंद्रीय निवडणूक आयागाने दिलेला निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातून गेली.
शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेलं. त्यामुळे शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाचं काय होणार?
शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून आयोगाने मान्यता दिल्यानं शिवसेना भवनावर कोणाचा अधिकार असणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.
दादरमधील शिवसेनेचं मुख्यालय असलेली भवन ही इमारत शिवसेनेच्या मालकीची नाही.
शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. त्यामुळे शिंदे गट त्यावर दावा करू शकणार नाही.
शिवसेना भवनावर दावा करता येणार नसला, तरी महाराष्ट्रात शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून वाद होऊ शकतात.
शिवसेनेच्या काही शाखा विविध नावांवर आहेत. ज्या शाखा कोणाच्याही नावावर नाहीत, त्यावर शिंदे गट दावा करू शकतो.
ADVERTISEMENT