–इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
‘जशी सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल, तसा यांचा नारळ फोडण्याचा उपक्रम सुरु राहील. त्यामुळे जनतेनं नारळ फोड्या गॅंगपासून सावध रहावे’, असं म्हणत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. ‘जे आपण केलंच नाही, ते केलं सांगत हे तुम्हांला भुलवतील’, असं टीकास्त्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर डागलं आहे.
‘शाहूपूरीवासियांना 20 वर्षापासून तुम्ही वंचित ठेवलं, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी तुमच्यावर केला आहे’, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारण्यात आला होता. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, ‘जे काम मंजूर होतं त्याचा नारळ फोडायला ही मंडळी पुढं असतात’, असा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना लगावला.
‘लोटांगण घाला, पण नगरपालिकेला लोळवायची वेळ आनु नका’, शिवेंद्रराजे भोसलेंचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
‘गेल्या 20 वर्षात त्यांच्याकडे खासदारकी होती. काही काळ ते मंत्री देखील होते. शाहूपुरीची ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य यांच्याच नेतृत्वाखाली निवडून येत होते. खरंतर 20 वर्षापासून शाहूपूरीवासियांनी त्यांना जबाबदारी दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यापासून कुणी वंचित ठेवले?’, असा प्रश्न शिवेंद्रराजेंनी विचारला.
साताऱ्यात दोन राजेंमधला वाद पेटला!
‘जस जशा निवडणुका जवळ येतील तसे त्यांचे नारळ फोडण्याचा उपक्रम सुरु होणार आहे. हद्दवाढीचा निर्णय यांच्यामुळेच लांबला, हे सत्य आहे. ज्या मार्गाने पैसे मिळतील, त्या मार्गाने खायचा असे त्यांचे काम सुरु असते. त्यामुळे नारळ फोड्या गॅंगला सातारकर आता नारळ देतील आणि संपुर्ण सातारा विकास आघाडीला घरी बसवेल’, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT