Osmanabad : आमदार कैलास पाटील आमरण उपोषणावर : शेतकऱ्यांसाठी ठाकरे गट आक्रमक

मुंबई तक

• 03:44 PM • 23 Oct 2022

उस्मानाबाद – गणेश जाधव अतिवृष्टीची नुकसान भरपाई,पीक विमा याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सोमवार (24 ऑक्टोबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. […]

Mumbaitak
follow google news

उस्मानाबाद – गणेश जाधव

हे वाचलं का?

अतिवृष्टीची नुकसान भरपाई,पीक विमा याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सोमवार (24 ऑक्टोबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात विमा कंपनी व सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची 1 हजार 200 कोटी रुपये रक्कम थकीत आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती, ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार ते मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत. शेतकरी संकटात व दुःखात असल्याने मी दिवाळी शेतकऱ्यांसोबत उपोषणस्थळी करणार असून खराब झालेल्या सोयाबीनच्या राशीचे लक्ष्मीपुजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सन 2020 च्या पिक विम्याची 531 कोटी रक्कम जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी.

  • ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये.

  • सन 2020-21 च्या पीक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपये विमा पात्र सहा लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.

  • सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी डगफुटी रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 248 कोटी रुपये दोन लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.

  • चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी ढगफुटी पिकावरील रोगराईमुळे संपूर्ण पिके आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे, त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना जीवघेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा. अशा काही मागण्या आमदार पाटील यांनी केल्या आहेत.

    follow whatsapp