माणगावात मध्यरात्री थरारक घटना, दोघा बाइकस्वारांचा मेडिकल दुकान चालकावर गोळीबार

मुंबई तक

• 06:06 AM • 12 Feb 2022

मेहबूब जमादार, माणगाव: माणगाव शहरात कचेरी रोड मार्गावर शनिवार 12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 वाजण्याच्या सुमारास काळया रगांच्या मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी मेडिकलचे दुकान बंद करून चालत येणाऱ्या तरुणावर पिस्तूलने तीन राऊड फायर करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे दोघे अज्ञात हल्लेखोर आपल्या मोटारसायकलवरून मुंबई-गोवा महामार्गाने इंदापूरच्या दिशेने पळून […]

Mumbaitak
follow google news

मेहबूब जमादार, माणगाव: माणगाव शहरात कचेरी रोड मार्गावर शनिवार 12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 वाजण्याच्या सुमारास काळया रगांच्या मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी मेडिकलचे दुकान बंद करून चालत येणाऱ्या तरुणावर पिस्तूलने तीन राऊड फायर करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे दोघे अज्ञात हल्लेखोर आपल्या मोटारसायकलवरून मुंबई-गोवा महामार्गाने इंदापूरच्या दिशेने पळून गेले.

हे वाचलं का?

या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद दिपक रामकिशोर यादव (वय 24 वर्ष) याने पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटनेने माणगाव शहरासह सबंध रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून भरवस्तीत अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजताच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी दिपक रामकिशोर यादव व जखमी तरुण शुभम ग्यानचंद जैस्वाल (वय – 24) रा. सुखादेवी इमारत कचेरी रोड, माणगाव हे आपले सोनी मेडिकल दुकान बंद करून कचेरी रोड येथून घरी पायी चालत जात असताना शारदा स्वीट मार्टच्या समोर आल्यावेळी त्यांच्या समोरून कचेरी रोड येथून एक काळया रंगाची पल्सर मोटार सायकल या गाडीवरील अज्ञात चालकाने इदांपूरला जाणारा रस्ता कोठे आहे? असे विचारले.

तेव्हा शुभम हा त्यांना रस्ता सांगत असतानाच अचानक मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्याच्या जवळील पिस्तुल काढून शुभम याच्या पोटाच्या उजव्या बाजूस धरून त्याला ठार मारण्याचा उद्देशाने गोळी झाडली.

हा हल्ला एवढा अनपेक्षित होता की, ज्यामुळे काय घडलं हेच शुभमला समजला नाही. या हल्ल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने इंदापूर बाजूकडे पळून गेले. सदरच्या घटनेचे कारण समजले नसून माणगाव पोलीस अज्ञात आरोपी इसमांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, हा हल्ला नेमका का आणि कुणी केला याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेलं नाही.

घरी जाताना वाटेतच करण्यात आला गोळीबार; कामगाराचा मृत्यू, सराफा व्यापारी जखमी

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात भादंवि संहिता कलम 307, 34 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे व पोलीस निरीक्षक माणगाव आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेग हे करीत आहेत.

    follow whatsapp