अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्यानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त समोर आल्यापासून शोक व्यक्त होत असून, शेहनाज गिलला धक्काच बसला आहे. सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त ऐकून शेहनाजने शुटिंग अर्ध्यावर सोडलं. त्यानंतर आज सिद्धार्थवर अंत्यसंस्कार केले जात असून, त्यापूर्वीचा शेहनाजचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर मुंबईतील ओशीवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सिद्धार्थचे कुटुंबीय, मित्र व चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. सिद्धार्थचं पार्थिव थेट कूपर रुग्णालयातून ओशीवरा स्मशानभूमीत आणण्यात आलं.
शेहनाज गिलही स्मशानभूमीत पोहोचली. त्यावेळची दृश्य समोर आली असून, सिद्धार्थच्या जाण्यानं शेहनाजवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. एका गाडीतून शेहनाज ओशीवरा स्मशानभूमीत आली. यावेळी शेहनाज तिचा भाऊ धीर देत आहे.
फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून सिद्धार्थचं पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आलं. ही रुग्णवाहिका बघून शेहनाजने मोठ्याने सिद्धार्थ अशी हाक मारत टाहो फोडला. त्यानंतर ती पळतच रुग्णवाहिकेकडे गेली. शेहनाजची ही अवस्था बघून उपस्थितांच्या काळीज हेलावलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
शेहनाजला दुःख पचवण्याचं बळ मिळो
सिद्धार्थ आणि शेहनाज ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती. त्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. शेहनाजचे स्मशानभूमीतील दृश्य आता समोर येत आहे. ही दृश्य बघून चाहते हळहळ व्यक्त करत आहे. शेहनाजला अशा अवस्थेत बघू शकत नाही, असं काही जणांनी म्हटलं आहे. तर काहीजणांनी सिद्धार्थ शेहनाजची गोष्ट अधुरीच राहिल्याचं म्हटलं आहे.
शेहनाजचा सिद्धार्थला आवाज देतानाचा व्हिडीओ बघून अनेकांनी अतीव वेदना होतं आहे. काही जण हा व्हिडीओ शेअर करत शेहनाजला हे दुःख पचवण्याचं बळ मिळो, अशी प्रार्थना करत आहे.
ADVERTISEMENT