मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) गुरुवारी (2 सप्टेंबर) निधन झाले होते. त्याच्या निधनामुळे टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. सिद्धार्थवर आज (3 सप्टेंबर) मुंबईच्या ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे सिद्धार्थ शुक्लावर ब्रह्मकुमारी प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सिद्धार्थ आणि त्याची आई अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित आहेत. सिद्धार्थ अनेकदा ब्रह्मकुमारी केंद्राला भेटही देत असे.
ADVERTISEMENT
‘आज तक’ने ब्रह्मकुमारी तपस्विनी बेन सोबत याबाबत बातचीत केली. आणि जाणून घेतले की, सिद्धार्थ शुक्ला याच्यावर ब्रह्मकुमारी प्रथेनुसार अंत्यसंस्कार कसे केले जातील. दरम्यान, कोव्हिड प्रोटोकॉल लक्षात घेता अंत्यविधीच्या प्रथेमध्ये काही बदलही केले जाऊ शकतात.
ब्रह्मकुमारी तपस्विनी बेन यांनी सांगितलं, अंत्यसंस्कार नेमके कसे केले जातील?
ब्रह्मकुमारी तपस्विनी बेन यांनी सिद्धार्थच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ब्रह्मकुमारी प्रथेनुसार अत्यंविधी कसे होतील याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘आम्ही त्याच्या अमर, अविनाशी आत्म्यासाठी सर्व जण तेथे जाऊन ध्यान (मेडिटेशन) करू. त्यानंतर पार्थिव शरीराला टिळा लावण्यात येईल.’
‘हे झाल्यानंतर सिद्धार्थच्या पार्थिव देहाला फुलांचा हार घालण्यात येईल. तसंच त्यावेळी सगळे जण ‘ओम’चा जप करतील आणि नंतर त्याला श्रद्धांजली अर्पण केली जाईल. अशा पद्धतीने विधी पार पडेल. आम्हा सर्वांना सिद्धार्थच्या निधनामुळे प्रचंड दु:ख झालं आहे. तो आमचा लाडका भाऊ होता.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थची स्तुती करताना त्या म्हणाल्या की, ‘तो एक चांगला आणि उदार वृत्तीचा व्यक्ती होता. तो नेहमी मेडीटेशनचा देखील सराव करायचा. तो आमच्या 7 दिवसांच्या अभ्यासक्रमामध्येही सहभागी झाला होता. तो नेहमी ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित होता. रक्षाबंधनालाच सिद्धार्थ इथे आला होता.’ असंही त्यांनी सांगितलं.
Sidharth Shukla: थेट कूपर रुग्णालयातूनच सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्ययात्रेला सुरुवात
सिद्धार्थ शुक्लाला चटकन राग यायचा?
सिद्धार्थला ‘अँग्री यंग मॅन’ असे म्हटले जाते. त्याला चटकन राग यायचा असं म्हटलं जातं. जे आपल्याला बिग बॉसमध्ये देखील पाहायला मिळालं होतं. ब्रह्मकुमारी तपस्विनी बेनला जेव्हा विचारण्यात आले की सिद्धार्थला खरोखरच चटकन राग यायचा का? तेव्हा त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘मला तरी कधीच असं वाटलं नाही की,की सिद्धार्थ हा रागीट होता. तो काही रागीट भूमिका करायचा. पण तो मुळात रागीट स्वभावाचा नव्हता. तो सर्वांचा आदर करणारा व्यक्ती होता. तो प्रत्येकाशी सहकार्याने वागायचा.
ADVERTISEMENT