नितेश राणेंना अटक की जामीन? कोर्टाने निर्णय राखून ठेवला, मंगळवारी दुपारी होणार अंतिम सुनावणी

मुंबई तक

• 12:50 PM • 31 Jan 2022

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालय उद्या दुपारी निर्णय घेणार आहे. आज कोर्टात सरकारी पक्ष आणि राणेंच्या वकीलांनी आपली बाजू मांडली. दिवसभर चाललेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवत मंगळवारी ३ वाजता निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं. अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढून आलेल्या नितेश राणेंच्या […]

Mumbaitak
follow google news

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालय उद्या दुपारी निर्णय घेणार आहे. आज कोर्टात सरकारी पक्ष आणि राणेंच्या वकीलांनी आपली बाजू मांडली. दिवसभर चाललेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवत मंगळवारी ३ वाजता निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं.

हे वाचलं का?

अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढून आलेल्या नितेश राणेंच्या पदरी निराशा पडली होती. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत राणेंना जिल्हा न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते.

सकाळी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे कायदेशीररित्या शरण आलं नसल्याचं सांगितलं. यावेळी घरत यांनी नितेश राणेंना ताब्यात घेण्याची मागणी केली. ज्याला राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी हरकत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने राणेंना १० दिवसांचा अवधी दिल्याचं सांगितलं.

नितेश राणेंची बाजू मांडताना वकील सतीश मानेशिंदे यांनी, राकेश परब हे राणेंचे पीए असून त्यांच्यासोबत दिवसातून कितीही वेळा संभाषण होऊ शकतं. तसेच राणे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळे कथित आरोपीसोबत त्यांचा फोटो असणं याला कनेक्शन म्हणता येणार नाही. ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा नितेश राणे हे मुंबईतच होते. ते पोलीसांना सर्व ते सहकार्य करत आहेत. यानंतर सरकारी वकील घरत यांनी नितेश राणे कोर्टाचा आवार सोडून गेल्याबद्दल आक्षेप नोंदवला.

यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आजच्या दिवसाचं कामकाज थांबवत मंगळवारी तीन वाजता निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं.

    follow whatsapp