पुरंदर: दिवे घाटात एक नवरी मुलगी चारचाकी वाहनांच्या बोनेटवर बसून भररस्त्यात फूट शूट करत असल्याचं समोर आलं होतं. त्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गोष्टीला काही दिवस नाही उलटत तोच आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर अतिउत्साही दोन युवक कारच्या बोनटवर बसून धोकादायक स्टंट करत असल्याचं दिसून आलं.
ADVERTISEMENT
पुरंदर तालुक्यातील भिवरी-गराडे रोडवरील चतुर्मुख मंदिर परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी त्याचबरोबर निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटनासाठी येत असतात. परंतु नुकतेच चतुर्मुख मंदिराच्या बाजूला असलेल्या धोकादायक घाटामधून आतिउत्साही दोन युवकांनी कारच्या बोनटवर बसून धोकादायकरित्या प्रवास केला.
गाडी चालकाला पुढील काहीच भाग दिसत नसल्याने बोनेटवरील एक युवक हातवारे करत चालकाला रस्ता सांगतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने धोकादायकरित्या कार चालवून जीवघेणा प्रवास करणं हे स्वत: सोबतच इतरांच्याही जीवावर बेतणारं ठरु शकलं असतं.
यावेळी कायद्याचा कोणताही धाक न बाळगता हे तरुण अत्यंत बेदरकारपणे गाडी चालविण्यास सांगत असल्याचं देखील व्हीडिओमध्ये पाहायला मिळतं आहे.
राज्यात आता जवळपास सगळीकडेच लॉकडाऊन शिथिल होत आहे. अशावेळी अतिउत्साही लोक हे पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. पण यावेळी अनेक जण हे कोरोनाचे सर्व नियम अगदी पायदळी तुडवण्यात धन्यता मानताना दिसत आहेत.
रविवार व स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पुरंदर तालुक्यातील पर्यटनाच्या प्रत्येक स्थळावर गर्दी दिसून आली. दिवे घाट, बापदेव घाट, कापूरहोळ नारायणपूर घाट, गराडे खेडशिवापूर घाट, वीर धरण या सर्व परिसरात तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील अनेक जण चारचाकी वाहनाने येत होते.
Pune : फिरायला गेलेल्या पती-पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली, महिलेचा मृत्यू
यावेळी गाडीतील एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क दिसून आले नाहीत. त्यात भर म्हणून काही युवक दुचाकी दामटत हॉर्नचे प्रचंड मोठे आवाज काढत होते. तर या दोन अतिउत्साही युवकांनी तर कळसच केला.
दोघांनी चक्क चारचाकीच्या पुढच्याच भागावक बसून थेट जीवघेणा प्रवास केला. जणू काही रस्ता सुरक्षा कायदा हा न पाळण्यासाठीच असतो अशा आविर्भात हे युवक दिसून आले. अशा उद्दामपणाला आळा घालण्याचे व कायद्याचा धाक दाखवण्याचे आव्हान आता पुरंदरच्या पोलीस यंत्रणेपुढे आहे.
ADVERTISEMENT