सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे तक्रार

मुंबई तक

• 11:04 AM • 26 Oct 2021

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक झालं आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत फेसबुक इंडियाकडे आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे असं धनंजय मुंडे यांचं ट्विट आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या […]

Mumbaitak
follow google news

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक झालं आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत फेसबुक इंडियाकडे आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे असं धनंजय मुंडे यांचं ट्विट आहे.

हे वाचलं का?

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय. तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या फेसबुक पेजचा अॅडमिन अॅक्सेस काढून घेण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी आपलं फेसबुक पेजचा अॅक्सेस पुन्हा प्राप्त करुन देण्याची मागणी फेसबुक इंडियाकडे केली आहे.

दरम्यान, शिक्षण क्षेत्रात बीड पॅटर्न निर्माण व्हावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे केंद्र बीड जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) केंद्र देखील जिल्ह्यात सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मुंडे यांनी 19 ऑक्टोबर रोजी दिली होती.

    follow whatsapp