टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूचं गूढ हळहळू उलगडताना दिसत आहे. या प्रकरणात नवी बाजू समोर आली आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाकाने गोवा पोलिसांत तक्रार दिलीये, ज्यात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून सोनाली फोगाटचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय. सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान आणि तिचा मित्र सुखविंदर यांच्यावर करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
सोनाली फोगाटच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार सुधीर सांगवान आणि सुखविंदरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी सोनाली फोगाटला जेवणातून नशा येणारा पदार्थ मिसळवून जेवण दिलं गेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या कृत्याचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर तिला सातत्यानं ब्लॅकमेल केलं जात होतं. सोनाली फोगाटच्या भावाने केलेल्या या दाव्याने या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय. आता या अंगाने पोलिसांनी तपास सुरू केलाय.
सोनाली फोगाटच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा, पोस्टमॉर्टेमचा अहवाल समोर
सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने गोवा पोलिसांत दिलेली तक्रार तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. यात सोनाली फोगाटचा मृत्यू कसा झाला? सोनाली फोगाटची हत्या झालीये का आणि सोनाली फोगाटला अश्वील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केलं गेलंय का?
सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाकाने तक्रारीमध्ये काय म्हटलं आहे?
सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने अनेक पानी तक्रार दिलीये. यात सरळ सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवानवर हत्येचा आरोप केला आहे.
रिंकू ढाकाने तक्रारीत म्हटलंय की, आम्ही एकूण २ भाऊ आणि ३ बहिणी आहोत. सोनाली फोगाट दुसऱ्या क्रमांकाची बहिणी आहे. रेमन आणि सोनाली फोगाटचा हिसारमधील एकाच कुटुंबातील दोन भावांशी विवाह झाला होता.
लग्नानंतर २०१६ मध्ये सोनाली फोगाटचा पती संजय फोगाटचा मृत्यू झाला. त्यानंतर सोनाली फोगाटने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजकारण आणि अभिनयात तिने स्वतः गुंतवून घेतलं होतं.
सुधीर सांगवानने खीर खाऊ घातली अन्…
सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाकाने तक्रारीत पुढे म्हटलंय की, वर्ष २०१९ मध्ये निवडणुकीच्या काळात रोहतकमध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदरशी तिची भेट झाली. दोघेही भाजपचे कार्यकर्ते होते आणि निवडणूक प्रचाराच्या संदर्भात भेटले होते.
सुधीर सांगवान हिसारचा आहे, तर सुखविंदर भिवानीचा राहणारा आहे. सोनाली फोगाटची संपत्ती हडप करण्याचे मनसुबे दोघांचे आहेत. त्याचबरोबर यात राजकीय कटकारस्थानही आहे.
वर्ष २०२१ मध्ये सुधीर सांगवान हा सोनाली फोगाटचा पीए म्हणून काम करू लागला. त्याचवेळी सोनालीच्या घरात चोरी झाली होती. तेव्हापासून सुधीर सांगवानने घरातील सर्व कामगारांना काढून टाकलं आणि घरातील सर्व कामं स्वतःच बघू लागला होता. एकदा सोनालीने सांगितलं होतं की, तिला सुधीर सांगवानने खीर खाऊ घातली होती. ती खाल्ल्यानंतर तिचे पाय थरथरू लागले होते. काही वेळ बधीर झाले होते.
बलात्कार आणि व्हिडिओ… सोनाली फोगाटच्या ब्लॅकमेलिंगचं प्रकरण काय?
सोनाली फोगाटचा भाऊ रिंकूने तक्रारीत म्हटलं आहे की, ३ वर्षांपूर्वी हिसारमध्ये एक घटना घडली होती. त्यावेळी सुधीर सांगवानने हिसारमधील त्याच्या घरी जेवणात नशेचा पदार्थ मिसळवला होता. तो सोनाली फोगाटला दिला. त्यानंतर तिच्या बलात्कार केला. या कृत्याचा व्हिडीओही त्याने बनवला होता. या व्हिडीओच्या आधारेच तो तिला ब्लॅकमेल करत होता, असा आरोप त्याने केला.
सुधीर सांगवान हा सोनाली फोगाटच्या संपत्तीची कागदपत्रं, बँकेशी संबंधिक कागदपत्रं आणि तिचे एटीएमही स्वतः जवळच ठेवत होता, असं या तक्रारीत म्हटलेलं आहे.
सोनाली फोगाटच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांना खोटी माहिती दिली गेली?
रिंकू ढाकाने आरोप केलाय की, २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजता सुधीर सांगवानने माझ्या मोठ्या भावाला फोन केला. सुधीर सांगवानने माझ्या भावाला सांगितलं की, तुमची बहीण सोनाली फोगाटचा चित्रपटाच्या शुटिंगवेळी मृत्यू झाला आहे.
सोनाली फोगाटच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह गोव्यामध्ये आलो. इथे आल्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोणत्याही चित्रपटाचं शुटिंग सुरू नसल्याचं कळलं. त्याचबरोबर चित्रपटाच्या शुटिंग ठरलेलंही नव्हतं, असंही कळलं. त्यामुळे हा ठरवून करण्यात आलेली हत्या आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT