दोन वर्षांपासून संपूर्ण विश्व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतात प्रत्येक सण हा नियम आणि बंधनांमध्ये राहून साजरा करावा लागत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीही काही तासांवर येऊ घातलेल्या होळी आणि धुलिवंदनाचा सणही यंदा नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारने या सणासाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
रंग खेळताना गर्दी होऊन त्या माध्यमातून पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही नियमावली राज्य सरकारने जाहीर केल्याचं कळतंय.
राज्य सरकारच्या गृहविभागाने ही नियमावली जाहीर केली असून यात रात्री १० वाजल्याच्या आत होळी पेटवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरही मनाई करण्यात आली आहे.
लठमार होली, राधा-कृष्णाच्या प्रेमाची महती जपणारा रंगोत्सव
असे आहेत राज्य सरकारने होळी आणि धुलिवंदनासाठी जाहीर केलेले नियम –
-
रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे
-
होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे
-
दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल
-
होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल
-
होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन
-
कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
-
धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत
दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT