महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. ही वाढ पाहता राज्यातली आरोग्यव्यवस्था कमी पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चिंताजनक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगीन उपक्रमाअंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
नागपुरात Corona चा कहर, २४ तासात ५४ रूग्णांचा मृत्यू
फेस मास्क –
सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
सोशल डिस्टन्सिंग –
सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल याची काळजी घ्यावी. दुकानदारांनीही आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. एकावेळी पाचपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊ नये.
याव्यतिरीक्त सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास दंड ठोठावण्यात येणार असून, सार्वजनिक ठिकाणी पानमसाला, गुटखा, दारूचं सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याचसोबत खासगी ऑफिससाठीही सरकारने काही महत्वाचे नियम आखून दिले आहेत. शक्य होईल तिकडे वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्यात यावं. याचसोबत कामाचे तासही विभागून देता येईल अशा उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त थर्मल स्क्रिनींग, कामाच्या ठिकाणी सॅनिटायजरचा वापर, कामाचं ठिकाण ठराविक दिवसांनी सॅनिटाईज करुन घेणं, कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगंच पालन होईल याची काळजी घेणं असे सर्व नियम खासगी ऑफिसना बंधनकारक करण्यात आले आहेत.
याव्यतिरीक्त राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपयांचा दंड बसणार आहे. लग्न व इतर सोहळ्यांसाठी ५० जणांची मर्यादा घालून देण्यात आली असून अंत्य संस्कारासाठी २० जणांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीत आपल्याला लॉकडाउन लावण्याची इच्छा नाही पण राज्यात वाढत असलेला रुग्णसंख्येचा आकडा चिंताजनक असल्याची भीती व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT