कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधत रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम ठेवत ज्या ठिकाणी रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे तिकडे निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार असल्याची माहिती दिली.
ADVERTISEMENT
“कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार आहे. या लाटेत अनेकांनी आपले मित्र गमावले, काहींनी आपली मुलं गमावली तर काहींनी आपल्या पालकांना गमावलं. या मुलांना सरकार एकट सोडणार नाही. यासंदर्भात सरकार लवकरच योजना जाहीर करेल”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली.
कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही, लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
या भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लादण्याचं काम नाईलाजाने करावं लागत असल्याचंही सांगितलं. परंतू या परिस्थितीतही जनता नियम पाळत आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. मागच्या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्येच शिखर आपण सणासुदीनंतर गाठलं होतं. यावेळी आपण हे त्याआधीच गाठलं आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आलेलं असून यापुढे परिस्थिती पाहून निर्बंध लावण्याचा किंवा शिथील करण्याचा निर्णय घेतला जाईल असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात Lockdown 15 दिवसांनी वाढला,’या’ जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध काही अंशी शिथील
ADVERTISEMENT