बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नवीन गाण्यावरून वाद सुरू झाला आहे. गायिक कनिका कपूरच्या आवाजातील मधुबन गाण्याविरोधात मथुरेतील पुजारी आक्रमक झाले आहेत. सरकारने सनी लिओनीच्या गाण्यावर बंदी घालावी, अन्यथा आपण न्यायालयात जाऊ, अशी भूमिका काही पुजाऱ्यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री सनी लियोनीचं मधुबन गाणं सध्या चर्चेत आहे. 22 डिसेंबरला हे गाणं रिलीज झालं असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असून, त्यावर बंदी घालण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
मथुरेतील पुजाऱ्यांनी सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ गाण्याला विरोध दर्शवला आहे. पुजाऱ्यांनी गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सनी लिओनीने गाण्यात अश्लीलपणे नृत्य केलेलं असून, यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने गाण्यावर बंदी आणली नाही, तर आपण न्यायालयात जाऊ असंही या पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार वृदांवनमधील संत नवलगिरी महाराज यांनी या मुद्द्यावरून सरकारकडे सनी लिओनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या गाण्यावर सरकारने बंदी घालावी. सरकारने म्हणणं ऐकलं नाही, तर आपण न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. सनी लिओनीने गाण्यातील दृश्य काढून टाकावीत आणि माफी मागावी, नाहीतर तिला भारतात राहू देणार नाही, असंही नवलगिरी महाराजांनी म्हटलं आहे.
सनी लिओनीचं नृत्य असलेलं मधुबन गाण कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायलेलं आहे. गणेश आचार्याने या गाण्याची कोरिओग्राफी केलेली असून, मनोज यादवने हे गीत लिहिलेलं आहे. रिलीज झाल्यापासून हे गाण ट्रेंडमध्ये असून, आता वादात अडकण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT