अभिनेत्री आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या गंगुबाई काठीयावाडी या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शुक्रवारी ठरलेल्या वेळेप्रमाणे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जस्टीस इंदिरा बॅनर्जी आणि जस्टीस जी.के.महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
ADVERTISEMENT
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाने निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चित्रपटाचं नाव बदलणं शक्य आहे का असं विचारलं होतं. परंतू याला उत्तर देताना निर्मात्याच्या वकीलांनी ऐन वेळेला नावात बदल करणं शक्य नसल्याचं सांगितलं. खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीकडे तो गंगुबाई यांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचा फक्त दावा आहे, त्यासाठी कोणताही पुरावा नसल्याचं निर्मात्याच्या वकीलांनी सांगितलं.
२०११ साली छापण्यात आलेल्या या पुस्तकावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. या चित्रपटात गंगुबाई यांची कोणत्याही प्रकारे बदनामी झालेली नसल्याचं निर्मात्याचे वकील अर्यमा सुंदरम यांनी सांगितलं. याचिकाकर्त्यांनी फिल्म न पाहताच हे आरोप केल्याचं सुंदरम यांनी कोर्टासमोर सांगितलं. हा चित्रपट एका महिलेच्या संघर्षाची कहाणी असल्याचंही निर्मात्याचे वकील सुंदरम यांनी सांगितलं.
आलियाचा गुलाबो अवतार, फॅन्सच्या काळजावर थेट वार
याचिकाकर्त्याकडे असा कोणताही पुरावा नाही की ज्यावरुन सिद्ध होईल की चित्रपटात गंगुबाई यांचा अपमान केला आहे, त्यामुळे ही याचिका रद्द करण्यात यावी अशी मागणी निर्मात्याच्या वकीलांनी केली. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही सर्वोच्च न्यायालयात भन्साळी यांची बाजू मांडली. याचिकाकर्ते गंगुबाईचे दत्तक पुत्र असल्याचा दावा करत आहेत, पण त्यांच्याकडे याबद्दलचा कोणताही पुरावा नसल्यामुळे या चित्रपटाला प्रदर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली.
“माझ्या आईला वेश्याच बनवून टाकलं”; संजय भन्साळी, हुसैन झैदींविरुद्ध बदनामीचा खटला
या चित्रपटात निर्माते, दिग्दर्शक, वितरक, थिएटर मालक अशा सर्वांचे पैसे गुंतलेले आहेत. कोर्टाकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरुद्ध आलेला निर्णया सर्वांसाठी आर्थिक तोट्याचा ठरु शकतो, ज्यामुळे पैशांची ही साखळी तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी द्यावी अशी मागणी रोहतगी यांनी केली. खंडपीठाने याचिकाकर्त्याला गंगुबाई यांनी तुम्हाला कधी दत्तक घेतलं होतं हे सांगावं लागेल. जर तुम्हाला याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्हाला यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कसा दिला? असा प्रश्न विचारला. याचिकाकर्ते बाबुजी राव शहा आपण गंगुबाई यांचे दत्तक पुत्र असल्याचं सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे त्यांची याचिका रद्द करुन कोर्टाने गंगुबाई काठियावाडी सिनेमाला प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
मेरी हंसिनी…प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज
ADVERTISEMENT