Today Gold Rate: मुंबईसह देशातील 'या' प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कडाडले! कारण वाचून धडकीच भरेल

मुंबई तक

18 Oct 2024 (अपडेटेड: 18 Oct 2024, 12:47 PM)

Gold Rate In India: आज गुरुवारी 18 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे. देशातील अनेक शहरांतील बुलियन मार्केटमध्ये करवा चौथआधीच सोन्याचे भाव वाढले आहेत.

gold-silver prices today 31 august 2024 in maharashtra mumbai pune know the full details

आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत?

follow google news

बातम्या हायलाइट

point

आजचे सोने-चांदीचे दर काय?

point

सोने-चांदीचे दर अचानक का वाढले?

point

मुंबईसह देशातील 'या' प्रमुख शहरांतील सोन्याचे दर भिडले गगनाला

Gold Rate In India: आज गुरुवारी 18 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे. देशातील अनेक शहरांतील बुलियन मार्केटमध्ये करवा चौथआधीच सोन्याचे भाव वाढले आहेत. ज्वेलर्स सूत्रांच्या माहितीनुसार, सण-उत्सवात मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत उलथापालथ झाली आहे. 

हे वाचलं का?

चांदीच्या किंमतीतही वाढ झाल्याची माहिती आहे. चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 96900 रुपयांवर पोहोचले आहेत. आज दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, लखनऊ आणि जयपूरसह उत्तर भारताच्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 78,270 रुपयांवर पोहोचली आहे. आधीच्या दरांनुसार यात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 71,760 रुपये झाला आहे.

भुवनेश्वर, मुंबई, कोलकाता

24 कॅरेट : प्रति 10 ग्रॅम, 78120 रुपये
22 कॅरेट : प्रति 10 ग्रॅम, 71610 रुपये

सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचं कारण काय?

देशभरात सोन्याच्या किंमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती आणि करन्सी एक्स्चेंज रेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास भारतीय बाजारावर याचा परिणाम होतो. तसच सण-उत्सवांच्या काळात वाढत्या मागणीमुळेही सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळतं. 

हे ही वाचा >> Ravindra Dhangekar Tweet: रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची पहिली यादी फोडली! विधानसभेसाठी कुणाला मिळाली संधी?

दिल्ली

दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71760 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78270 रुपये आहे. 

मुंबई 

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71610 रुपयांवर पोहोचला आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78120 रुपये आहे. 

अहमदाबाद 

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71660 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78170 रुपये आहे.  

चेन्नई 

चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71610 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78120 रुपयांवर पोहोचला आहे. 

कोलकाता 

कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71610 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78120 रुपये आहे.

गुरुग्राम

गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71760 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78270 रुपयांवर पोहोचला आहे.

हे ही वाचा >> Baba Siddique : ''मला गोळी लागलीय, मी आता...'', छातीत गोळ्या घुसल्यानंतर सिद्दीकींचे अखेरचे शब्द

लखनऊ

लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71760 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78270 रुपये झाला आहे.

बंगळुरु

बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71610, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78120 रुपये झाला आहे. 

जयपूर

जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71760 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78270 रुपयांवर पोहोचला आहे.

पटना 

पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71460 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचे दर 78170 रुपये इतका आहे.

भुवनेश्वर 

भुवनेश्वरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71610 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78120 रुपये झाला आहे.

हैदराबाद 

हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71610 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 78120 रुपयांवर पोहोचला आहे.

    follow whatsapp