संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. एकीकडे वेगवेगळ्या यंत्रणा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे अजूनही या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे सुरू आहेत. आज परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचे मुलही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
सुरेश धस यांनी या सभेमध्ये आकांचे आका म्हणत पुन्हा परळीतील नेत्यावर निशाणा साधला. तर यापुढे जाऊन सुरेश धस यांनी अजित पवार यांनाही सवाल केला. अजित पवार क्या हुओ तेरा वादा... अजितदादा कायको इसको अंदर लिया? ये अंदर लेनेजैसा नहीं है... संदीप दिघुळेपासून ते संतोष देशमुखपर्यंत हत्येची बेरीज करा, अजितदादा जरा हिशोब करा... या हत्या कुणी घडवून आणल्या, यामागचा मास्टरमाईंड कोण? हे जर माहिती नसेल तर बारामतीचे माणसं परळीत पाठवा. तिथे आमच्या समाजाला, अठरापगड जातींना काय वागणूक मिळतेय बघा. 200 कुटुंब घर सोडून चालले असं म्हणत सुरेश धस यांनी तुफान हल्लाबोल केला.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : केज, नांदेड ते पुण्यातील बालेवाडी... सुदर्शन घुले, सुधीर सांगळे कसे सापडले? डॉ. वायबसेंचा रोल काय?
पुढे बोलताना सुरेश धम म्हणाले, मी अजित पवार यांना म्हणालो होतो, मला संधी मिळत नाही तर तुम्ही प्रकाशदादा सोळुंकेंना मंत्री करा. ते पाचव्या टर्मचे आमदार आहे, नाही जमलं तर राजेश विटेकर यांना करा, नाही तर बुलढाण्याच्या कायंदेला करा असं धस म्हणाले. आमचा जिल्हा बिनमंत्र्याचा राहूद्या, राजेश विटेकर तुम्ही सगळे मुख्यमंत्र्यांकडे जा असं म्हणत धस यांनी थेट नाव न घेता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला विरोध केला.
ADVERTISEMENT
