दाक्षिणात्य (तेलुगू) फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत असलेल्या सुधीर वर्मा यांने अचानक जगाचा निरोप घेतला. सुधीरने तेलंगणातील वारंगल येथील राहत्या घरी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT
सुधी वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारीला अभिनेता सुधीर वर्माने वारंगल येथे विषारी द्वव्याचे सेवन केलं. त्याची प्रकृती खालावली. नंतर तो हैदराबादमध्ये नातेवाईकांच्या घरी गेला होता, त्याने विषारी पदार्थाचं सेवन केलं असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी उस्मानिया रुग्णालयात त्याला दाखल केलं होतं.
CM Shinde: ‘बाळासाहेबांनी कधी CM पदासाठी तडजोड केली नाही’, कोणाला टोमणा?
सुधीरला 21 जानेवारी रोजी विशाखापटनम येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुधीर वर्माचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुधीर वर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विझाग येथे होणार आहे.
अशी होती सुधीर वर्माची अभिनयातील कारकीर्द
अभिनेता सुधीर वर्माच्या जाण्याने संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुधीरने 2013 मध्ये ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, त्याला ‘कुंदनपू बोम्मा’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली. हा त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता.
सुधीर वर्माला सह-कलाकारांकडून श्रद्धांजली…
सुधीर वर्मासोबत ‘कुंदनपू बोम्मा’ चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या सुधाकर कोमकुलाने सुधीरच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्याने ट्विट करत लिहिले, ‘तुला भेटून आणि तुझ्यासोबत काम करताना आनंद झाला. तू आता आमच्यात नाही, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे! ओम शांती!’
तसेच, अभिनेत्री चांदनी चौधरीनेही ट्वीट केलं आहे. चांदनीने लिहिलं आहे. ‘सुधीर तुझ्या जाण्याने माझे मन हेलावलं आहे. तू एक उत्तम सहकलाकार आणि चांगला मित्र होतास. आम्ही तुला विसरू शकणार नाही.’
ADVERTISEMENT