इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
ADVERTISEMENT
किर्ती मोटे हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. किर्ती उर्फ किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले. या घटनेमुळे समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली म्हणून तिचे वडील नाराज झाले होते. किर्तीचे वडील तिच्या आईला शिव्या देत होते, मारहाण करत होते आणि तू तिच्याकडे लक्ष देऊ शकली नाहीस सांगत होते. त्यामुळे किर्तीला तिच्या आईने आणि भावाने ठार केले. आता या प्रकरणातला आणखी एक सैराट अँगल समोर आला आहे. किर्तीला तिच्या वडिलांनी बुलेट घेऊन दिली होती.
किर्ती मोटेला तिच्या वडिलांनी बुलेट घेऊन दिली होती. या बुलेटवरच ती वैजापूर येथील महाविद्यालयात जात येत होती. किर्तीचं लग्न तिच्या वडिलांना धुमधडाक्यात करायचं होतं. पण तिने प्रेमविवाह केल्याने वडिलांच्या सगळ्या इच्छांना सुरुंग लागला. हाच राग मनात ठेवून ते आईला ते कोसत असत. त्यामुळेच तिच्या आईने आणि तिच्या भावाने तिला ठार केलं.
भावाने कोयत्याचे वार करत बहिणीचं शीर केलं धडावेगळं आणि ओरडला.. औरंगाबादच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किर्ती मोटे या तरूणीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. तिचा भाऊ अल्पवयीन आहे. आईने आणि मुलाने मिळून ही हत्या केली असं पोलिसांनी सांगितलं आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगाव या ठिकाणी ही धक्कादायक आणि भयंकर घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी किर्तीने प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मनात धरून या दोघांनी मुलीला ठार केलं. जी मृत्यू झालेली मुलगी तिचं वय 19 वर्षे होती. मुलगी तिच्या घरी राहून शेती करत होती. सगळं कुटुंब सोबत राहात होतं.
औरंगाबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून बहिणीला कोयत्याने गळा चिरून संपवलं
किर्ती जेव्हा चहा करण्यासाठी जेव्हा स्वयंपाक घरात गेली होती. त्याचवेळी तिच्या आईने आणि भावाने तिच्यावर वार केले. तिचं शीर धडावेगळं केलं आणि व्हरंड्यात आणून ठेवलं. तिचा भाऊ ओरडला आणि सासरच्यांना सांगू लागला बघा हिला मी ठार केलं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना घडल्यानंतर गावातून फोन आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. Additional SP डॉ. पवन बनसोड यांनी ही माहिती दिली आहे. किर्तीच्या आईला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर भावाची रवानागी बाल न्यायमंडळात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT