आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने आई वडिलांनी मुलीला घरातून फरफटत नेत केली मारहाण

मुंबई तक

08 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या आई-वडिलांनी मुलीला बेदम मारहाण करत तिला फरफटत नेलं आहे. ही घटना अमरावतीतल्या अंबाडा गावात झाली आहे. सावरखेड या ठिकाणी एका १९ वर्षांच्या तरूणीचं अंबाडा येथील प्रतीक तडस या युवकाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी २८ एप्रिलला अमरावती आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. त्यानंतर मुलगी ४ मे रोजी घरून मुलांकडे निघून […]

Mumbaitak
follow google news

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या आई-वडिलांनी मुलीला बेदम मारहाण करत तिला फरफटत नेलं आहे. ही घटना अमरावतीतल्या अंबाडा गावात झाली आहे. सावरखेड या ठिकाणी एका १९ वर्षांच्या तरूणीचं अंबाडा येथील प्रतीक तडस या युवकाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी २८ एप्रिलला अमरावती आर्य समाज मंदिर येथे विवाह केला.

हे वाचलं का?

त्यानंतर मुलगी ४ मे रोजी घरून मुलांकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना समजताच मुलीकडील दहा ते बारा जण अंबाडा येथे पोहोचले. त्यांनी मुलीला फरपटत,मारहाण करत उचलून नेले.

प्रतीकने आपल्या पत्नीला मारहाण करून नेल्याची मोर्शी पोलीस ठाण्यात केली. मात्र मागच्या तीन दिवसात पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. मात्र सोशल मीडिया वर हा व्हीडिओ व्हायरल होताच शुक्रवारी रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणलं आहे. या ठिकाणी या मुलीचा जबाब इन कॅमेरा नोंदवला जाणार आहे.

मुलीने आपल्याला इथंच राहायचं अशी दयायाचना केली. पण, आई-वडिलांनी तिचे काहीही ऐकले नाही. हात आणि पाय धरून मुलीला अक्षरश: घरातून उचलून नेलं. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणानंतर मुलाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मुलीकडच्या नातेवाईकांविरुद्ध मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे व्हीडिओत?

या व्हीडिओत सुरूवातीला एक मुलगी बसलेली दिसते आहे. तेवढ्यात काही माणसं तिथे येतात. काही महिलाही सोबत असतात. ते सगळे या मुलीला फरफटत घराबाहेर नेतात. त्यावेळी ही मुलगी ओरडत, विव्हळत असते. मात्र तिचं कुणीही ऐकून घेत नाही. तिला फरफटत बाहेर घेऊन गेलं जातं आणि तिला मारहाणही करण्यात येते. संपूर्ण व्हीडिओत मुलीचा आक्रोश आणि रडणं ऐकू येतं. ती इतकी रडत असूनही तिच्या मदतीला कुणीही येत नाही किंवा तिला मारहाण करणं थांबवत नाहीत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    follow whatsapp