महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन पॅरेलाईज झालं आहे असं मी म्हणणार नाही. मात्र महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. १६ वर्षे निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं. त्यांच्याकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला जातो, खंडणी मागतली जाते त्यामुळे या प्रकरणी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट हा फडणवीसांचा आरोप नवाब मलिकांनी तोच रिपोर्ट दाखवून कसा खोडला?
आणखी काय म्हणाले फडणवीस?
माझ्याकडे जे काही पुरावे होते ते पुरावे मी केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. पोलीस दलाच्या बदलीच्या रॅकेटकडे हे पुरावे मी दिले आहेत. पोलिसांच्या बदलीच्या रॅकेटचे पुरावे दिले आहेत. २५ ऑगस्टचं पत्र आत्तापर्यंत दाबून का ठेवलं असाही प्रश्न देवेंद्र फडणीवस यांनी विचारला. केंद्रीय गृहसचिवांकडे मी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फोन टॅपिंग प्रकरणातले पुरावे दिले आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मी केंद्रीय गृहसचिवांकडे सगळी कागदपत्रं दिली आहेत. त्यांना मी विनंती केली आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. २५ ऑगस्टपासून हा अहवाल राज्य सरकारकडे होते. तत्कालीन डीजीपी यांनी सीआयडी चौकशी करण्याची शिफारस करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कोण उघडं पडेल अशी भीती राज्य सरकारला वाटत होती? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपांबाबत काय सांगाल असं विचारलं असता, “नवाब मलिक यांनी केलेला दावा खोटा आहे. बदल्यांच्या संदर्भातला अहवाल डिजीपी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिला होता. या अहवालातील काही रेकॉर्डिंग या मुख्यमंत्र्यांनीही ऐकल्या आहेत” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदल्यांबाबत केलेलं वक्तव्य दिशाभूल करणारं-नवाब मलिक
केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज ते त्यांनी केंद्रीय गृह सचिवांना भेटून पोलीस बदली रॅकेट प्रकरणाचे सगळे पुरावे दिले. माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिले आहेत. माझ्याकडे असलेल्या पूर्ण माहितीचं ब्रिफिंगही त्यांना दिलं आहे आता मला विश्वास आहे की ते योग्य तो निर्णय या प्रकरणात घेतील.
ADVERTISEMENT