राजीनाम्याचा प्रश्नच नाही, गृहमंत्री चांगलं काम करतायत- जयंत पाटील

मुंबई तक

• 11:11 AM • 15 Mar 2021

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक केली. यानंतर गेल्याकाही दिवसांपासून मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना राज्य सरकारकडून मिळणारा पाठींबा या दोन मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली […]

Mumbaitak
follow google news

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक केली. यानंतर गेल्याकाही दिवसांपासून मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना राज्य सरकारकडून मिळणारा पाठींबा या दोन मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाईल अशा बातम्या फिरत होत्या. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

हे वाचलं का?

16 वर्ष निलंबन.. तरीही सचिन वाझे का आणि कसे परतलेले मुंबई पोलिसात?

“मंत्रिमंडळा फेरबदल होणार ही बातमी चुकीची आहे. गृहमंत्रीपदावरुन अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. ते चांगलं काम करत आहेत. शरद पवारांनी आजची बैठक ही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बोलावली होती. त्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक झाली ज्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.” जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांना माहिती दिली. दरम्यान, सचिन वाझेंच्या अटकेनंतर विरोधी पक्षातील भाजपने शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

सचिन वाझेंनी IPL बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली – नितेश राणे

सचिन वाझे आणि शिवसेनेचं कनेक्शन अधोरिखीत करत भाजप गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेला आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना नितेश राणेंनी गंभीर आरोप केले. “गेल्या वर्षी सप्टेंबर तो नोव्हेंबरच्या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा तरुणांसाठी सुरु केली होती. पण मग इथे बेटींग सुरु झालं. मुंबईत अनेक ठिकाणी मॅचवर सट्टे लावण्याचं काम चालतं. सचिन वाझेंनी या बुकींना फोन करुन तुम्ही कुठे सट्टा लावत आहात, तुमचं लोकेशन कुठे आहे हे आम्हाला सर्व माहिती आहे. जर अटक करुन घ्यायची नसेल तर १५० कोटी द्या नाहीतर मी तुमच्या अड्ड्यांवर छापेमारी करीन. अशा पद्धतीने सचिन वाझे बुकींकडून खंडणी मागत होते.”

यावेळी बोलत असताना नितेश राणे यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात संभाषण झाल्याचं सांगितलं. वाझेंनी बुकींना फोन केल्यानंतर सरदेसाईने वाझेंना फोन करुन तुम्ही मागितलेल्या पैशांपैकी आमचा वाटा किती?? अशी विचारणा केल्याचं नितेश राणेंनी सांगितलं. या सर्व संभाषणांचे डिटेल्स NIA ने जाहीर करावे अशी मागणी राणे यांनी केली आहे. सध्या २५ मार्चपर्यंत नितेश राणे NIA कस्टडीत आहे. दरम्यान भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रविवारी वाझे प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच खडे बोल सुनावले होते.

‘याच’ CCTV फुटेजनंतर NIA ने केली सचिन वाझेंना अटक, पाहा नवं फुटेज

    follow whatsapp