कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी विहींप व इतर हिंदू संघटनांनी सुरु केलेली निधी संकलनाच्या मोहीमेची तुलना थेट हिटलरच्या नाझी विचारसरणीशी केली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर टीका करताना कुमारस्वामी यांनी ज्या घरात राम मंदिरासाठी निधी दिला जाणार नाही त्या घरांवर विशिष्ठ प्रकारे मार्किंग केलं जात असल्याचंही कुमारस्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सध्या असं वातावरण तयार करण्यात येतंय की जिकडे कोणीही आपल्या मनातल्या भावना स्पष्टपणे बोलून दाखवणार नाही. अशा परिस्थितीत सामान्य व्यक्तीच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे याची खात्री देता येत नाही असंही कुमारस्वामी म्हणाले.
कर्नाटकातील शिवमोगा येथील कार्यक्रमात बोलत असताना कुमारस्वामींनी थेट संघ परिवाराला आपल्या टिकेचं लक्ष्य केलं. “राम मंदिरासाठी निधी गोळा करणारे कार्यकर्ते पैसे न देणाऱ्या घरांचं नाव लिहून ठेवत आहेत. माझ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे न देणाऱ्या घरांवर विशिष्ठ पद्धतीने मार्किंग केलं जातंय. असं का केलं जातंय मला माहिती नाही. नाझींनी जर्मनीत जे केलं तेच संघ परिवार इकडे करत आहे. ज्यावेळी जर्मनीत नाझी विचारसरणी उदयास आली त्याचवेळी भारतात संघाचा जन्म झाला.”
सध्या देशात अघोषित आणीबाणी जाहीर असून लोकं आपले विचार मोकळेपणाने मांडू शकत नसल्याचंही कुमारस्वामी म्हणाले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कुमारस्वामींचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ADVERTISEMENT