Torres Scam News Mumbai : गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळण्याच्या अपेक्षेत असणाऱ्या हजारो लोकांची नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मोठा झटका बसला आहे. टोरेस ज्वेलरी कंपनी हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप होत आहे. कंपनीचे दादर आणि मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्यानं दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली होती. यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीशी संबंधित एका महिलेनं सांगितले की, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणींमुळे गुंतवणूकदारांचे परतावे त्यांना पाठवले जात नसल्याचं तिला सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
माहितीनुसार, 2023 मध्ये नोंदणीकृत 'प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने 2024 मध्ये 'टोरेस' ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडलं. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणीही आपले आऊटलेट्स उघडले.
कंपनीने काय आश्वासन दिलं होतं?
कंपनीने सोनं, चांदी आणि मॉइसॅनाइट दगड (लॅबने तयार केलेले हिरे) खरेदीच्याच रकमेवर 48, 96 आणि 52% वार्षिक परतावा देण्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं. गुंतवणूकदारांना दर आठवड्याला परतावे मिळत होते. दोन आठवडे परतावा न मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.
मॉइसनाइट खरेदीवर भर
कंपनी गुंतवणूकदारांना सोनं-चांदी खरेदी करण्याऐवजी मॉइसॅनाइट खरेदी करण्याचा आग्रह धरला होता. त्यावर सर्वाधिक परतावा देखील दिला गेला, जो साप्ताहिक 8 ते 11% पर्यंत होता. कंपनीच्या वेबसाइटनुसार, प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेडचे नोंदणीकृत कार्यालय गिरगावमधील ऑपेरा हाऊस इमारतीत आहे. कंपनीचे तीन संचालक आहेत: इम्रान जावेद, सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टाइन. तिन्ही संचालकांनी त्यांचे पत्तेही कंपनीच्याच पत्यावर दाखवले आहेत.
हे ही वाचा >> Pune Crime News : कंपनीच्या पार्किंगमध्ये 28 वर्षीय तरूणीची कोयत्याने सपासप वार करत हत्या, कंपनीत सोबतच करत होते काम
दरम्यान, या योजनेबाबत काही आठवड्यांपूर्वी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केल्याचं वकील तरुण शर्मा यांनी सांगितलं. त्यांच्या ओळखीमुळे अनेकांनी लाखो रुपये गुंतवले आहेत. त्याचप्रमाणे मोहम्मद आलमने सांगितलं की, त्याने अलीकडेच त्याच्या एका मित्राच्या सांगण्यावरून 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याच्या मित्रानेही नऊ लाख रुपये गुंतवले होते. त्याला दर आठवड्याला 48 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण दोन आठवडे पैसे आले नाहीत.
मालक दुबईला पळून गेला?
रात्रभर शटर बंद असल्याची माहिती मिळताच शेकडो गुंतवणूकदारांची गर्दी कार्यालयात जमली. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. कंपनीचे मालक दुबईत असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
हे ही वाचा >> Ramgiri Maharaj Statement : 'जन गण मन'ला विरोध, "वंदे मातरम हे खरं राष्ट्रगीत"; रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानं वाद होणार?
एकूणच या संपूर्ण गोंधळामुळे हजारो लोक सध्या संकटात आले आहेत. भरघोस परतावा मिळण्याच्या अपेक्षेत अनेकांनी आयुष्यभराची बचत या योजनेत गुंतवली होती. मात्र, दुसरीकडे अशा अनेक आकर्षक योजनांमध्ये पैसे गुंतवणं टाळण्याचा सल्ला पोलीस आणि आर्थिक विषयातील तज्ञ देत असतात.
ADVERTISEMENT
