जळगाव : पपईने भरलेल्या ट्रकचा अपघात, १५ मजूर ठार

मुंबई तक

• 02:43 AM • 15 Feb 2021

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात झालेल्या भीषण ट्रक अपघातात १५ मजूरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावळजवळली किनगाव भागात सोमवारी पहाटे पपईने भरलेला ट्रक उलटण्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमधून प्रवास करत असलेल्या १५ मजुरांचा यात मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील १० सदस्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यावरुन एक आयशर ट्रक […]

Mumbaitak
follow google news

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात झालेल्या भीषण ट्रक अपघातात १५ मजूरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावळजवळली किनगाव भागात सोमवारी पहाटे पपईने भरलेला ट्रक उलटण्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमधून प्रवास करत असलेल्या १५ मजुरांचा यात मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील १० सदस्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यावरुन एक आयशर ट्रक पपई घेऊन रावेरच्या दिशेने जात होता. यावल तालुक्यातील किनगाव जवळ ट्रक आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. या प्रवासादरम्यान सर्व मजुर हे ट्रकमध्येच झोपले होते, अपघातानंतर ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या पपईच्या ढिगाखाली हे मजुर सापडल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचले असून अपघाताता जखमी झालेल्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या अपघाताचं नेमकं कारणं अद्याप समजू शकलेलं नाही.

    follow whatsapp