राज्यात झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असा ठामपणे दावा केला होता, पण भाजपला पुन्हा सत्ता मिळवता आली नाही. मात्र, या विधानावरून फडणवीसांना अजूनही राजकीय टोले लगावले जाताना दिसतात. याच विधानावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं.
ADVERTISEMENT
‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘तब्येत कशी आहे आणि मंत्रालयात कधीपासून येणार?’ असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सुरुवात करताना आपण जे बोललात की, मी पुन्हा यावर अनेकांचा विश्वास नव्हता. किंवा पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईल की नाही, असं वाटलं होतं. सलग तिसऱ्या वर्षी आलो आहे. म्हणजे न सांगता येणं याच्यात जास्त गंमत असते आणि पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हेच बरं,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपण फडणवीसांच्या वर्मावरच बोट ठेवलं.
विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही-उद्धव ठाकरे
तब्येतीच्या बाबतीत म्हणाल, तर तुमच्यासमोर जसा आहे, तसा आहे. अनपेक्षितपणे मला एका अनुभवाला सामोरं जावं लागलं. तो अनुभव काय होता? कसा होता यावर जास्त न बोललेलं बरं. आता बराचसा मार्गावर आलो आहे. नाही म्हटलं तरी राजकीय नाही, पण शारीरिक शक्तीपात झाला होता. पूर्वपदावर येतोय. मला खात्री आहे. जिद्द, हिंमत आणि आत्मविश्वास असल्यानंतर काहीच अशक्य नसतं. हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलं आहे. ते शेपूट पण लवकरच जाईल. ते गेलं की पुन्हा मंत्रालयात जाण्याची सुरूवात करेन,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली.
Uddhav Thackeray: ‘एवढी वर्ष आपण भाजपला पोसलं आणि त्यांनीच…’, उद्धव ठाकरे संतापले
“मधला काळ आव्हानात्मक होता. शस्त्रक्रियेचा सोडा… कोरोनाचा! त्याकाळात मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. आता मंत्रालय पूर्ववत सुरू झालेलं आहे. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतं आहे. ते झालं की मंत्रालयात जाण्यास सुरू करेन. अधिवेशनातही जाईन”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT