मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी काल शिवसेना खासदारांची एक महत्त्वाची बैठक होती. ही बैठक जवळपास 3 तास चालली. यामध्ये पक्षाच्या 9 खासदारांपैकी 8 खासदार उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत केरळमध्ये असल्यानं या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. बैठकीनंतर पक्षाच्या खासदारांनी एकत्र राहणारअसल्याची भूमिका मांडली. खासदारांनी असंही स्पष्ट केलं की, कोणताही खासदार नाराज नाही आणि कोणीही पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Dhananjay Munde : "धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार", फेसबूक पोस्टमुळे चर्चांना उधान
आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं उद्धव गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी सांगितलं. सर्व खासदार पक्ष नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, कोणताही खासदार नाराज नाही, कुणीही पक्ष सोडणार असल्याची चर्चा नाही. तर खासदार संजय दिना पाटील म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून कुठं का जाऊ? आपण जिथे आहोत तिथे आनंदी आहोत. शिंदे गटातील कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही.
दुसरीकडे, पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले, की आमचा पक्ष महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, पूर्वी हे पद विरोधी पक्षांना देण्यात आलं होतं. त्यावेळी 10 टक्के जागाही जिंकल्या नव्हत्या. ते म्हणाले की, 288 सदस्यांच्या राज्य विधानसभेत विरोधी पक्षांची एकत्रित संख्या सुमारे 50 आहे. आमदारांची संख्या कमी असली तरी, संविधानात असा कोणताही कायदा किंवा तरतूद नाही की विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालावं. शिवसेनेकडे 20 आमदारांचं संख्याबळ आहे.
हे ही वाचा >> "आरोपींना कोर्टाकडून कठोर शिक्षा...", CM देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख हत्याप्रकरणी नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं की, जर शिवसेना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करणार असेल, तर आम्ही विधान परिषदेत त्याच पदाची मागणी करू. सध्या, शिवसेनेचे अंबादास दानवे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत, परंतु त्यांचा कार्यकाळ या वर्षी ऑगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे आता काय काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
