अंबरनाथमध्ये दुकान मालकाचं भयंकर कृत्य! अल्पवयीन मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार

मुंबई तक

• 11:44 AM • 19 Nov 2021

दुकानात काम करणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण करत दुकान मालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची भयंकर घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. आरोपीचं बिर्याणीचं शॉप आहे, तिथेच पीडित मुलगा कामाला आहे. सध्या सगळीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. लैगिंक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी होत असतानाच एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार […]

Mumbaitak
follow google news

दुकानात काम करणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण करत दुकान मालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची भयंकर घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. आरोपीचं बिर्याणीचं शॉप आहे, तिथेच पीडित मुलगा कामाला आहे.

हे वाचलं का?

सध्या सगळीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. लैगिंक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी होत असतानाच एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

डोंबिवलीत पिंपरी चिंचवडच्या घटनेची पुनरावृत्ती! नरामधम बापाचा 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलासोबत काय घडलं?

पीडित मुलगा रात्री दुकानात बंद करून झोपला होता. यावेळी बिर्याणी दुकान मालकाने त्याच्यावर अत्याचार केला. पीडित मुलाने आपल्या आईला फोनवरून अत्याचाराची माहिती दिली.

त्यानंतर गावी असलेल्या आईने आरोपीला याबद्दल जाब विचारला. त्याचा राग आल्याने आरोपीने पीडित मुलाचं डोकं जमिनीवर आदळत जबर मारहाण केली. या मारहाणीत पीडित मुलाचे दोन दात पडले.

ग्राहकाच्या दक्षतेमुळे अत्याचाराला फुटली वाचा

दुसऱ्या दिवशी बिर्याणीच्या दुकानात एक ग्राहक बिर्याणी घेण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलाला ‘तुझा चेहरा का सुजला आहे’, अशी विचारणा केली. तेव्हा पीडित मुलाने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्या ग्राहकाला सांगितला.

‘नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ’ म्हणून बापच छळायचा; दोघांनी जेवण देतो म्हणून केला बलात्कार

या ग्राहकाने अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार दिली. त्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी उमरखान उस्मात उल्ला खान याला तात्काळ अटक केले. त्याला न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    follow whatsapp