कोरोनाविरुद्ध लढाईत लसीकरणाचा पुढचा टप्पा नवीन वर्षात ३ जानेवारीपासून सुरु होतो आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांना उद्यापासून देशभरात कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्ययंत्रणांनी जय्यत तयारी केली असून Cowin App वर यासाठी नोंदणी करायची आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात उद्यापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे.
ADVERTISEMENT
यासाठी नागपुरात सात लसीकरण केंद्रांवर लहान मुलांसाठी सोय करण्यात आली आहे. नागपुरातील जवळपास २ लाख ४७ हजार मुलांना ही लस दिली जाणार असल्याचं कळतंय. ३१ डिसेंबर २००७ पूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोव्हॅसिन लस दिली जाणार असून लस घेतल्याच्या २८ दिवसानंतर दुसरा डोज दिला जाणार आहे.
नागपुरातील खालील ठिकाणी उपलब्ध होणार लस –
1) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स, मिहान
2) शासकीय वैदयकीय महाविद्यालय,मेडिकल कॉलेज
3) इंदिरा गांधी महानगरपालिका रुग्णालय, गांधीनगर
4) प्रगती सभागृह, दिघोरी
5) महानगरपालिका आयसोलेशन हॉस्पिटल, जरीपटका
6) मध्य रेल्वे रुग्णालय
7) डॉ. आंबेडकर रुग्णालय, कामठी
शहरातील या सातही केंद्रांवर मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहीमेचा जास्तीत जास्त फायदा मुलांना मिळावा यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT