Varun Sardesai: ‘उंदराच्या बिळाखाली, राणेंच्या घराखाली येऊन दाखवलं, वरुण सरदेसाईंचं आव्हान

मुंबई तक

• 08:51 AM • 24 Aug 2021

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी राणेंच्या मुंबईतील घराबाहेर धडक दिली. यावेळी भाजप आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडाही झाला. यावेळी वरुण सरदेसाई यांनी नितेश राणे यांना थेट आव्हान देखील दिलं आहे. ‘मुख्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी राणेंच्या मुंबईतील घराबाहेर धडक दिली. यावेळी भाजप आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडाही झाला. यावेळी वरुण सरदेसाई यांनी नितेश राणे यांना थेट आव्हान देखील दिलं आहे.

हे वाचलं का?

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हा शिवसैनिकांचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्यावर जो कोणी हात उचलण्याची भाषा करत असतील तर शिवसैनिक शांत बसणार नाही. यांनी आम्हाला आव्हान दिलं होतं. म्हणे सिंहाच्या हद्दीत या… अरे ही कसली सिंहाची हद्द… हे तर उंदराचा बिळ आहे. उंदराच्या बिळाखाली आलोय आम्ही. बाहेर या.’ अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली आहे.

नितेश राणेंनी शिवसेनेला काय आव्हान दिलं होतं?

नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून थेट शिवसेनेला आव्हान दिलं होतं की, ‘अशी बातमी ऐकली की, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहूच्या बंगल्याबाहे जमणार आहेत. त्यामुळे एक तर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. नाही तर पुढे काय घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतो.’ असं ट्विट करुन नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं होतं.

पाहा वरुण सरदेसाईंनी नितेश राणेंना काय दिलं आव्हान?

‘त्यांनी आम्हाला आव्हान दिले होतं… काय तर म्हणे सिंहाच्या हद्दीत येऊन दाखवा. हे तर उंदराचं बिळ आहे. आम्ही इथे यांच्या घराच्या समोर येऊन बसलोय.. आम्ही येऊन दाखवलंय… पण हे गेले पळून… आम्ही अजून इथेच आहोत. हिंमत असेल तर यावं राणे यांनी. आम्ही दोन हात करायला तयार आहोत.

Rane यांच्या बंगल्याबाहेर प्रचंड राडा; सेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांचा लाठीमार

‘ते दोन्ही दीडफुटे पळून गेले आहेत. आमचं आंदोलन अत्यंत यशस्वी झाले आहे. उंदराच्या बिळासमोर अजून पण आम्ही ठाण मांडून बसलो आहोत. हिंमत असेल तर या आमच्या समोर.’ असं आव्हान वरुण सरदेसाई यांनी केलं आहे.

    follow whatsapp