‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. भारत २०१४ मध्ये स्वतंत्र झाला’, या अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं आहे. ‘कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत आहे’, असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. कंंगनाच्या विधानाचं समर्थन केल्यानं विक्रम गोखलेंना काय झालं? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते विक्रम गोखले हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान
यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी अभिनेते विक्रम गोखले यांना कंगना रनौतने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना विक्रम गोखले म्हणाले, “कंगना रनौत जे म्हणाली आहे की, जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते भीक मागून मिळालेलं आहे. त्यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का? हे ज्या योद्धयांनी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना फासावर जाताना. मोठंमोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचविले नाही.”
“आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहत आहेत. हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही. असेही काही लोक आपल्या केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे”, अशी भूमिका मांडत विक्रम गोखले यांनी कंगना रनौतच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
‘…तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते’ स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया
‘हे विधान म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी बलिदान दिलं, त्यांचा अपमान नाही का?’ त्या प्रश्नावर बोलताना विक्रम गोखले म्हणाले, ‘आहेच! पण हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, आपण म्हणजे कोण, तर आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे की, हे तुम्ही हे काय करत आहात?”, अशी भूमिका त्यांनी कंगना रनौतच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादावर मांडली.
ADVERTISEMENT