Vidhan Sabha : ३१ जुलैपर्यंत MPSC च्या रिक्त जागा भरणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

मुंबई तक

• 06:38 AM • 05 Jul 2021

पुण्यात MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने केलेल्या आत्महत्येचा मुद्दा आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षातील भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत सर्व कामकाज बाजूला ठेवत MPSC च्या कारभारावर चर्चा करण्याची मागणी केली. सरकारकडून बाजू मांडत असताना उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरल्या जातील असं आश्वासन दिलं. MPSC ला स्वायतत्ता […]

Mumbaitak
follow google news

पुण्यात MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने केलेल्या आत्महत्येचा मुद्दा आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षातील भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत सर्व कामकाज बाजूला ठेवत MPSC च्या कारभारावर चर्चा करण्याची मागणी केली. सरकारकडून बाजू मांडत असताना उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरल्या जातील असं आश्वासन दिलं.

हे वाचलं का?

MPSC ला स्वायतत्ता दिली आहे, स्वैराचार करायची परवानी नाही –

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी केली. राज्यात MPSC ला आपण स्वायतत्ता दिली आहे पण स्वैराचार करण्याची परवानगी नाहीये. स्वप्नील लोकणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी गोष्ट असून MPSC च्या कारभारात एक सिस्टीम आणण्याची गरज असल्याची मागणी फडणवीसांनी केली.

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “आपल्या मनाला वाटेल तसा MPSC चा कारभार सुरु आहे. स्वप्नीलच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया या सभागृहात दाखवा, या निगरगट्ट सरकारच्या डोळ्यात पाणी येईल. स्वप्नीलनंतर ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हे सरकार जर दगडाच्या हृदयाचं नसेल तर त्यांनी लोणकर कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी”, अशी मागणी मुनगंटीवारांनी केली.

राज्य सरकारकडून अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं. स्वप्नीलच्या आत्महत्येवर काल कॅबिनेटमध्ये आमची गंभीर चर्चा झाली. ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरुन काढण्यात येतील असं आश्वासन अजित पवारांनी सभागृहात दिलं. MPSC च्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता परंतू न्यायालयीन बाबींमध्ये हे प्रकरण अडकलं. यापुढे राज्यातल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर स्वप्नीलवर आलेली वेळ येऊ देणार नाही असं आश्वासन देतो असंही अजित पवार म्हणाले.

    follow whatsapp