४२ वर्षीय बापाने आपल्याच १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विशाखापट्टणम येथे घडली आहे. २३ जानेवारीला या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. मुलगी सतत फोनवर बोलत असल्याच्या रागातून बापाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
आरोपी बापाने आपल्या मुलीवर अनेकदा अशाच पद्धतीने शारिरिक अत्याचार केल्याचंही यावेळी चौकशीदरम्यान समोर आलं आहे. हा मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने आपल्या शाळेतील शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. ही गोष्ट ऐकल्यानंतर शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना शाळेत बोलवून घेत त्यांची कानउघडणी केली. वडिलांनी यानंतर मुलीची माफीही मागितली. या प्रकारानंतर शाळेतील शिक्षकांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन आरोपी बापाला अटक केली असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. तपासादरम्यान, आरोपी दोन वर्षांपूर्वी किडनीच्या आजारामुळे त्रस्त होता. त्याच्या बायकोने आपली किडनी डोनेट केली होती. पाच महिन्यांपूर्वी आई तब्येत बिघडल्यानंतर ती आपल्या माहेरी काही दिवसांसाठी रहायला गेली. यादरम्यान आरोपी बाप आपल्या मुलीची काळजी घेत होता.
अकोला: आरोपीसोबत अनैसर्गिक कृत्य, एक पोलीस कर्मचारी निलंबित
परंतू यादरम्यान आपली मुलगी सतत फोनवर बोलत असते याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. याच रागातून त्याने आपल्या मुलीवर शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आणखी एका घटनेत विशाखापट्टणम पोलिसांनी ५ वर्षीय मुलीवर अत्याचार केलेल्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT