Devendra Fadnavis: ‘पवार गट-उबाठा यांना लाजा वाटत नाहीत?’, फडणवीस संतापले; नंतर केली मोठी घोषणा

ऋत्विक भालेकर

20 Oct 2023 (अपडेटेड: 20 Oct 2023, 12:14 PM)

Devendra Fadnavis Press: देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची मोठी घोषणा मुंबईतील पत्रकार परिषदेत केली आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले फडणवीस.

we decided to cancel contract recruitment big announcement by dcm devendra fadnavis he criticized mahavikas aghadi

we decided to cancel contract recruitment big announcement by dcm devendra fadnavis he criticized mahavikas aghadi

follow google news

Cancel Contract Recruitment GR: मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (20 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी राज्यातील कंत्राटी भरतीचा (contract recruitment) जीआर (GR) रद्द केला असल्याचं सांगितलं. राज्यात कंत्राटी भरती करण्याचा जीआर जारी झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून तरुणांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं होतं. अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलनं देखील झाली होती. ज्यामुळे सरकारने हा जीआरच रद्द केल्याचं जाहीर केलं. मात्र, असं करताना कंत्राटी भरतीचं पाप हे महाविकास आघाडी सरकारचंच आहे अशी जोरदार टीका फडणवीसांनी यावेळी केली आहे.

हे वाचलं का?

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीस नेमकं काय म्हणाले?

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याच्या निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कंत्राटी भरतीचं पाप 100 टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की, त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं? त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा GR आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.’ अशी मोठी घोषणा फडणवीसांनी यावेळी केली.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: ‘पाटील तर शिवसेनेचा…’ ललित पाटील प्रकरणी फडणवीसांचा ठाकरेंवर मोठा आरोप

‘माझ्याकडे कागदं आज जरा जास्त.. पण सगळ्यांना एक्सपोज करणार’

दरम्यान, या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे काहीसे संतापलेले दिसून आले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच म्हणाले की, ‘आज माझ्याकडे कागदपत्रे जास्त आहेत, पण सगळ्यांना एक्सपोज करणार आहे.’ असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना नेमका इशारा दिला.

‘1 सप्टेंबर 2021 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे होते मुख्यमंत्री होते. त्यांनी कंत्राटी भरतीला मान्यता दिली होती. 2 सप्टेंबरला महाटेंडर पोर्टलवर याचा मसुदा प्रकाशित झाला. 9 सप्टेंबरला निविदापूर्व बैठक घेण्यात आली. 31 जानेवारी 2022 रोजी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.’ असं म्हणत फडणवीसांनी कंत्राटी भरतीचं खापर हे महाविकास आघाडी सरकारवर फोडलं.

‘यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे म्हणून मी..’

देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदांमध्ये खूपच संयमी असतात. पण आज ते बरेच संतापलेले दिसून आले. ‘कंत्राटी भरतीबाबत मोठ्या प्रमाणात गदारोळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषत: जे याचे दोषी आहेत. जे यांनी केलं आहे. तेच याचा आवाज करत आहेत. म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजापुढे आलं पाहिजे. यांची थोबाडं उघडी पडली पाहिजेत. या दृष्टीने मी काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहचवायचा प्रयत्न करतोय.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

‘स्वतः निर्णय घ्यायचा आणि स्वतःच त्याविरोधात आंदोलन करायचे. मला आश्चर्य वाटते काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा यांना लाजा का वाटत नाहीत’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

हे ही वाचा >> Richard Kettleborough : अंपायरने दिला नाही वाइड बॉल, नियम की फिक्सिंग? समजून घ्या

‘कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रात पहिला निर्णय हा 13 मार्च 2003 ला झाला. तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झालेला. पहिली कंत्राटी भरती कशात सुरू झाली तर ती शिक्षण विभागात झाली. पहिला कंत्राटी भरतीचा निर्णय ही काँग्रेस आणि तेव्हाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिक्षण विभागात केला. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली जीआर काढून कंत्राटी भरती केली.’ असं म्हणत फडणवीस यांनी सध्याच्या सरकारबाबत तरुणांमध्ये असलेला राग शमविण्याचा प्रयत्न केला आहे.

आता याचा नेमका परिणाम कसा होतो हे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये समजणार आहे.

    follow whatsapp