प्रभाकरच्या 25 कोटींच्या आरोपांवर आता NCB ने काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर

मुंबई तक

• 11:56 AM • 24 Oct 2021

आर्यन खान प्रकरणाला नवी कलाटणी देणारा NCB चा साक्षीदार क्रमांक एक अर्थात अर्थात प्रभाकर साईल याने केलेले सगळे आरोप NCB ने फेटाळले आहेत. आज या प्रकरणाला जवळपास बावीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तो समोर आला आहे. त्याने मीडियासमोर येऊन आपलं म्हणणं मांडलं. के.पी. गोसावीने शाहरुखकडे २५ कोटींची मागणी केली होती त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचे […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खान प्रकरणाला नवी कलाटणी देणारा NCB चा साक्षीदार क्रमांक एक अर्थात अर्थात प्रभाकर साईल याने केलेले सगळे आरोप NCB ने फेटाळले आहेत. आज या प्रकरणाला जवळपास बावीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तो समोर आला आहे. त्याने मीडियासमोर येऊन आपलं म्हणणं मांडलं. के.पी. गोसावीने शाहरुखकडे २५ कोटींची मागणी केली होती त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचे होते. सॅम नावाचा एक माणूस आणि के. पी. गोसावी यांची दोनदा मिटिंग झाली होती असे अनेक दावे प्रभाकरने केले आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याने या सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत. तर NCB ने आता एक पत्रक काढून त्याला उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

‘आर्यनला सोडण्यासाठी के.पी. गोसावींनी शाहरुखकडे मागितले 25 कोटी, वानखेडेंना 8 कोटी!’

काय म्हटलं आहे NCB ने?

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. जर प्रभाकरला काही सांगायचं होतं तर त्याने ते सोशल मीडियावर किंवा मीडियाकडे न जाता कोर्टाकडे जायला हवं होतं. त्याच्यावर आता कारवाई केली जाईल. याचं कारण माननीय कोर्टात त्याचं नाव साक्षीदार म्हणून आहे. त्याने अशा प्रकारे वर्तन करणं योग्य नाही. आता एनसीबीने त्याच्यावर कारवाई संदर्भातलं एक प्रतिज्ञापत्र पाठवलं हे. प्रभाकर याने जे आरोप केले आहेत त्याचा त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा, रेकॉर्डिंग नाही. त्याने ऐकीव माहितीच्या आधारावर हे आरोप केले आहेत त्यामुळे त्या आरोपांना काही अर्थ नाही.

काय आहे प्रकरण?

इंडिया टुडेशी आणि मुंबईतकशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र, तो कागद कोरा (ब्लँक) होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना ग्रीन गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. साईल यांनी सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो.

25 कोटींचे आरोप

आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये प्रमुख साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली. त्यातले 8 कोटी हे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे होते असं प्रभाकर साईलने म्हटलं आहे. या प्रकरणात पंच म्हणून माझी सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. मला ज्या कागदांवर सह्या करायला लावल्या. सईल यांनी हेदेखील सांगितलं मी माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचितांकडे 10-12 दिवस राहिलो होतो.

साईल यांनी गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय. यात 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईल यांनी केला आहे.

कोण आहे प्रभाकर साईल

प्रभाकर साईल हे क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच आहेत.

हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड आहे.

किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था आहे.

    follow whatsapp