जगात सर्वाधिक वापरलं जाणारं What’s App हे अॅप डाऊन झालं आहे. मागच्या अर्ध्या तासापासून लोकांना मेसेज पाठवण्यात आणि येण्यात समस्या येत आहेत. तसंच अनेक ठिकाणी What’s App कनेक्टही होत नाहीये. त्याचाही फटका अनेकांना बसतो आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणं असेल किंवा ऑफिसचं काम करणं असेल अनेकांसाठी What’s App हे अत्यंत उपयुक्त अॅप आहे. मात्र गेल्या ३० मिनिटांपासून ते डाऊन झालं आहे. ट्विटरवर What’sAppDown हा ट्रेंड सुरू झाला आहे.
ADVERTISEMENT
दुपारी १२.३० च्या दरम्यान ठप्प झाली सेवा
दुपारी १२.३० च्या दरम्यान What’s App ची सेवा ठप्प झाली. अनेक अडचणी युजर्सना येत आहेत. याबाबत मेटा कंपनीकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. १२.३० च्या दरम्यान युजर्सना What’s App वापरण्यात अडचणी येऊ लागल्या. मेसेज जातही नव्हता आणि येतही नव्हता. त्यामुळे युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर ट्विटरवर तक्रारींचा पाऊस पडतो आहे.
What’s App ची सेवा खंडित होताच ट्विटरवर मीम्स
What’s App ची सेवा खंडित होताच ट्विटरवर मीम्स सुरू झाले आहेत. अनेक युजर्स विविध कल्पक मीम्स शेअर करत आहेत. What’s App ला ग्रहण लागल्याची उपहासात्मक टीकाही युजर्स फेसबुक आणि ट्विटरवर करत आहेत. तसंच आज भाकड दिवस असल्याने What’s App बंद ठेवण्यात आलं आहे अशीही खिल्ली फेसबुकवर उडवली जाते आहे.
नेमकी काय अडचण आली आहे?
What’s App ने काम करणं एकाएकी बंद झालं आहे. कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं बोललं जातं आहे. मात्र याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दुपारी १२.३० पासूनच लोकांना मेसेज येणं आणि पाठवणं यासाठी अडचणी येत आहेत. भारतातील कोट्यवधी लोकांकडे स्मार्ट फोन आहे. त्यात What’s App आहेच. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी उत्तम पर्याय तसंच मेसेज पाठवण्यापेक्षाही What’s App मेसेज करणं हा चांगला पर्याय लोकांकडे असतो. त्यामुळे सर्वाधिक मेसेज या What’s App वरूनच पाठवले जातात. अशात आता काही वेळापासून What’s App हँग झालं आहे.
ADVERTISEMENT