रश्मी ठाकरेंचे १९ बंगले गेले कुठे?; किरीट सोमय्यांनाही पडला प्रश्न, पोलिसांना दिलं पत्र

मुंबई तक

• 01:47 AM • 19 Feb 2022

काही वर्षांपूर्वी एकमेकांचे राजकीय मित्र असलेल्या शिवसेना-भाजपत सध्या आरोप प्रत्यारोपांची जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना शिवसेनेनंही आरोपांनीच उत्तर द्यायला सुरूवात केल्यानंतर हा वाद शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे. सोमय्यांनी विविध आरोपांसोबत रश्मी ठाकरे यांच्या नावे रेवदंडा परिसरातील कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे बंगलेच अस्तित्वात […]

Mumbaitak
follow google news

काही वर्षांपूर्वी एकमेकांचे राजकीय मित्र असलेल्या शिवसेना-भाजपत सध्या आरोप प्रत्यारोपांची जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना शिवसेनेनंही आरोपांनीच उत्तर द्यायला सुरूवात केल्यानंतर हा वाद शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे. सोमय्यांनी विविध आरोपांसोबत रश्मी ठाकरे यांच्या नावे रेवदंडा परिसरातील कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे बंगलेच अस्तित्वात नसल्याचं समोर आल्यानंतर सोमय्यांनी ‘अदृश्य बंगले’ शोधण्यासाठी पोलिसांना पत्र दिलं आहे.

हे वाचलं का?

रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ असलेल्या कोर्लई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे १९ बंगले असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला होता. कोविड केंद्र घोटाळा आणि इतर आरोपांसह बंगल्यांचा आरोप सोमय्यांनी सातत्याने केला जात आहे. सोमय्यांच्या या आरोपांवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी १९ बंगले कुठे आहेत, हे दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्याचबरोबर १९ बंगले नसतील सोमय्यांना बुटाने मारू, असा इशाराही दिला होता.

१९ बंगल्यांचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर कोर्लईच्या सरपंचांनीही याबद्दल भूमिका स्पष्ट केली होती. “प्रत्यक्षात या जागेची पाहणी केली असता, या जागेवर बंगले नाहीत. या जागेवर नारळाची झाडं, गुरांचा गोठा, पंप, शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नाही,’ कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी म्हणाले.

बंगलेच अस्तित्वात नसल्याचं समोर आल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी रेवदंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या अदृश्य झालेल्या १९ बंगल्याची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली.

तक्रारीत काय म्हटलंय?

“रश्मी उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांची कागदपत्रं देत आहोत. आम्हाला आतापर्यंत हे बंगलो तिथे आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. आज रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. गेली २ दिवस सरपंच सांगत आहेत ‘आता बंगलो नाही आहेत.’ सदर जागेवरील बंगलोचं काय झालं याची चौकशी करावी, विनंती”, अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांना दिली आहे. यावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश भोसले यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

संजय राऊतांनी काय दिला होता इशारा?

“किरीट सोमय्या उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप करतात. आपण सगळे जण एक दिवस त्या बंगल्यात पिकनिक काढू. जर ते बंगले तुम्हाला दिसले, तर मी राजकारण सोडेन. जर नसतील, तर मुलुंडच्या त्या दलालाला जोड्याने मारू. दररोज भपंकपणा सुरू आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचं काम सुरू आहे,” असं राऊत म्हणाले होते.

    follow whatsapp