Raj Thackeray: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला खतपाणी कोण घालतंय?

मुंबई तक

• 09:22 AM • 07 Dec 2022

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. एकीकडे शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सरकारवर टीका सुरू आहे. अशात आता राज ठाकरेंनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला कोण खतपाणी घालतं आहे असा सवाल केला आहे. काय आहे राज ठाकरेंचं पत्र? मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळून यावा […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. एकीकडे शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सरकारवर टीका सुरू आहे. अशात आता राज ठाकरेंनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला कोण खतपाणी घालतं आहे असा सवाल केला आहे.

हे वाचलं का?

काय आहे राज ठाकरेंचं पत्र?

मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळून यावा यासाठी पुन्हा कुणाकडून तरी प्रयत्न सुरू झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे उघड दिसतंय. पण महाराष्ट्रातून कोण याला खतपाणी घालतं आहे? हे सरकारने पाहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरू आहेत ते तातडीने थांबवा.

कर्नाटक महाराष्ट्र प्रश्न सामोपचाराने सुटायला हवा

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचाराने सुटायला हवा. पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवाना हे सांगणं आहे की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आणि आपल्या जे हवंय तेच आपण करायचं.

अचानकपणे चहुबाजूंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातो आहे. हे प्रकरण साधंसोपं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळी जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून ही कृती व्हावी अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने या प्रश्नात वेळीच लक्ष घालावं आणि हा वाद चिघळणार नाही हे पाहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमालीचा एकजिनसीपणा आहे. आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहे तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन्ही राज्यांमधला बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.

राज ठाकरे

    follow whatsapp